Pune Satara Highway Near Shirwal Nexon hits Divider in Horrific Accident Four Youth Die on the Spot; महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत
Pune Satara Highway Near Shirwal Nexon hits Divider in Horrific Accident Four Youth Die on the Spot; महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत
Pune-Satara Highway Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या चार मुलांपैकी तीन मुलं एकुलते एक होते.
पुणे-सातारा महामार्ग अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या पुण्यातील तरूणांच्या कारचा काल सोमवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव टाटा नेक्सॉन कार दुभाजकाला धडकून पलिकडच्या लेनवर जाऊन मालट्रकला धडकली. या अपघातात कारमधील चार महाविद्यालयीन तरुण जागीच ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी तिघेजण कुटुंबातील एकुलती एक मुलं होती.
मृतांची नावे
अपघातातील मृत आणि जखमी तरूण हे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि तळेगाव दाभाडे येथील आहेत. वेदांत अर्जुन वारिंगे (वय 19, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेद्र ठाकूर (वय. 19, रा. कामशेत ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय 19, रा. टाकवे. ता. मावळ) आणि निखील बाळू राऊत (वय 20, रा. कामशेत, ता. मावळ), अशी मृतांची नावे आहेत. तर दिक्षीत दयानंद पुजारी (वय 20, रा. कामशेत, ता. मावळ) आणि मयुर हणमंत शिंदे (वय 20, रा. बऊर, कामशेत, ता. मावळ), हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरूण नेक्सॉन कारने (MH 14 LJ 3033) काल सोमवारी रात्री पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. शिरवळ हद्दीत चालकाचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकून महामार्गावरील दुसऱ्या लेनवर जाऊन साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेल्या मालट्रकला (KA 27 C 5878) धडकली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर होऊन कारमधील चौघेजण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले.
उपचारापूर्वीच चौघांचा मृत्यू
काल सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरीष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. शिरवळ पोलीस, सारोळा महामार्ग मदत केंद्र, शिरवळ रेस्क्यू टीमने मृतदेह कारमधून बाहेर काढले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. उर्वरित दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.
Baramati Crime : अथर्व गोळी देऊन माझ्याशी संबंध ठेवणारे, आईला फोन, काही तासात मुलीचा गूढ मृत्यू, बारामतीत खळबळ शिरवळ पोलिसांनी सांगितलं की, मृत आणि जखमी तरूण हे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि तळेगाव दाभाडे येथील आहेत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. मृतांपैकी तिघे कुटुंबातील एकुलते एक होते. दरम्यान, मृत तरूणांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शिरवळकडे धाव घेतली. कोवळ्या वयातील मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. सध्या, मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ हे अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा