Headlines

Tharala Tar Mag Serial 11 August 2026 Episode ; Tharala Tar Mag : तुरुंगातल्या प्रियाच्या हालचालींवर सायलीला संशय, खबरी श्वेतामुळे अर्जुनच्या कामात महिपतकडून अडचणी


Tharala Tar Mag 11 August 2026 Episode : गौरी तापाने फणफणल्यामुळे अर्जुन तिची आणि सायलीची भेट घडवून आणतो, तर श्वेता सुभेदारांच्या घरावर लक्ष ठेवून असते.

tharala tar mag 11 august 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठरलं तर मग या मालिकेच्या 11 August 2026 च्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि चैतन्य सायलीला भेटायला आलेले असतात तेव्हा बोलताना त्यांच्या एक पॉईंट लक्षात येतो ते म्हणजे सोनलचं वय. वडगावला जेव्हा आग लागलेली असते त्याच दिवशी सोनलचा तिसरा वाढदिवस असतो. या हिशोबाने आता तिचे वय 21 असणार असते. पण सायलीवर अल्पवयीन मुलीची तस्करी हा आरोप झालेला असतो त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात येतं. अर्जुन स्वतः वडगाव ला जाऊन पुरावे तपासणार असल्याचं ठरवतो.
अर्जुन तिथून गेल्यावर सायली आपल्या सेलमध्ये असते. इतक्या तिला काहीतरी संशयास्पद आवाज ऐकू येतो. ती थोडा पुढे येऊन बघते तर एक कॉन्स्टेबल ही प्रियाच्या सेलच्या इकडे विनाकारण उभी असते आणि प्रिया सुद्धा तोंडावर हात ठेवून काहीतरी करत असते त्यामुळे सायलीला संशय येतो. प्रिया त्यावेळी श्वेताशीच फोनवर बोलत असते. सुभेदारांच्या घराचा सध्या काय चालू आहे याची अपडेट ती प्रियाला देते.

Maharashtra TimesMadhuri Dixit Host KBC : KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये सूत्रसंचालक पदी माधुरी दीक्षितची वर्णी

Tharala Tar Mag सुभेदारांच्या घरात सध्या चिंतेचे वातावरण असते कारण सायली न दिसल्यामुळे छोटी गौरी तापाने फणफणलेली असते. अश्विन तिच्यावर ट्रीटमेंट करतो पण त्याचा काहीच फरक पडत नसतो. अर्जुन घरी आल्यावर त्याला जेवाही परिस्थिती समजते तेव्हा तो लगेचच इन्स्पेक्टरला फोन करून तिला सायलीला भेटवण्याची परमिशन घेतो.

अर्जुन गौरीला घेऊन सायलीला भेटायला जातो तेव्हा ती खूप खुश होते. बऱ्याच दिवसांनी सायलीला समोर बघितल्यावर गौरी खूप भावुक झालेली असते. ती सतत तिला आपण घरी जाऊया असं हट्ट करते. सायली अगदी मायेने तिला समजावते. आजूबाजूचे लोक सुद्धा त्या दोघींच्या नात्याबद्दल अगदी कुतूहल आणि बघत असतात. तिथली एक कॉन्स्टेबल त्या आजूबाजूच्या माणसांना सांगते की ती तिची मुलगी नाही. ती अनाथ आहे सायलीने तिच्यावर माया लावली म्हणून तिचा तिच्यावर जीव जडला आहे. त्यानंतर सायली गौरीला नीट समजावून सांगते आणि शहाण्या बाळासारखा वाग म्हणून घरी पाठवते. गौरीला खूप ताप आल्यामुळे कुसुमताई ला सुद्धा तिची काळजी घ्यायला सांगते.
अर्जुन निघत असताना सायलीला तो वडगाव ला जाणार असल्याचे सांगतो.

Maharashtra TimesParesh Rawal Support Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना संरक्षण द्या, त्यांची बदली नको; परेश रावल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंतीथोड्या वेळाने सगळे जेवायला बसलेले असतात. तिथे एक महिला कैदी असते जिच्या सोबत तिचा मुलगाही असतो. तो मुलगा रडत असतो पण ती कैरी मात्र त्याच्यावर सतत ओरडत असते तेव्हा सायली तिला असं वागू नको म्हणून समजावते पण ती काही ऐकत नाही याउलट सायलीवरच ती भडकते. तुरुंगातलं वातावरण गरम झाल्यामुळे त्या कैदीला दुसरीकडे नेलं जात. त्यानंतर सायली त्याला मायेने भरू लागते. पण सायलीच्या चांगल्या वागण्याचा फायदा तिला तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी होईल हा विचार करून प्रिया लगेचच तिच्या विरोधात सगळ्यांचे कान भरू लागते. तिच्यावर मुलांची तस्करी करण्याचा आरोप आहे आणि इथे नाटकं करत आहे. त्याला सुद्धा ती पळवून नेईल असं सांगून ती सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. पण सायली सुद्धा तिच्यावर जशास तसे ओरडते पण यावेळी तिचा काही फायदा होत नाही.


दुसरीकडे अर्जुन बाहेर गेला असतो याबद्दल श्वेताला समजतं आणि ती लगेचच महिपत व इतर सर्वांना त्याबाबत माहिती देते. सचिन लगेचच त्याच्या पाठीत आपली माणसं लावतो. श्वेता महिपतशी बोलत असतानाच कल्पना तिथे येते पण श्वेता शिताफीने फोन लपवते. अर्जुन डॉक्टरांना भेटायला गेलेला असतो. त्याला सोनलच्या वयाची तपासणी करायची असते. तिथे एक वॉर्ड बॉय त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा