Headlines

8th Pay Commission Pensioners Demand; दर 3 महिन्यांनी DA वाढ, 3.83 फिटमेंट फॅक्टर, मिनिमम पेन्शन; पाहा नेमका काय आहे प्रस्ताव, कर्मचारी अन् पेन्शनर्सना फायदा होईल


8th CPC Latest News: आठव्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू आहे. अलीकडेच बैठकीचे एक सत्र दिल्लीत पूर्ण झाले, ज्यामध्ये वेगवेगळ्या विविध कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांनी आपली मते व मागण्या मांडल्या. त्याचप्रमाणे भारत निवृत्तीवेतनधारक समाजाची महागाई भत्त्याची मागणी चर्चेचा विषय बनली. सोमवार, 10 ऑगस्ट रोजी, दिल्लीतील बैठकीनंतर स्थानिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या मागण्याही समोर येतील.

दर तीन महिन्यांनी DA वाढीची मागणी

BPS म्हणजे भारत पेन्शनर्स समाजाने महागाईपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने दिल्लीतील बैठकीत महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत अधिक वारंवार बदल करण्याची मागणी केली. सध्या डीए आणि महागाई सवलतीमध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते, तर महागाईचा परिणाम मात्र स्थिर असतो. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देण्यासाठी दर तीन महिन्यांनी केले पाहिजे, असा संघटनेचा युक्तिवाद आहे. संघटनेने 7 ऑगस्ट रोजी आठव्या वेतन आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या सूचना केल्या.

Maharashtra TimesGold Silver Prices: सोन्यावर तेजीचा रंग चढला, चांदी 2.39 लाखांच्या पार; सामान्यांच्या खिशाला झळ, युद्ध नव्हे तर कोणत्या कारणांमुळे वाढताय सोन्या-चांदीचे भाव?‘द मिंट’च्या अहवालानुसार बीपीएसने केवळ DA-DR मध्ये सुधारणांची मागणी केली नाही तर बेसिक पगार, किमान पेन्शन आणि निवृत्तीवेतन सुधारणांशी संबंधित अनेक प्रस्तावही सादर केले आहेत. BPS संघटना अंदाजे 10 लाख निवृत्ती वेतनधारकांचे प्रतिनिधित्व करते आणि 245 संघटनांशी संलग्न असून DR एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यावर मूळ निवृत्तीवेतनात जोडला जावा आणि समान परिस्थितीत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये निवृत्तीवेतन समान केले जावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

मूळ निवृत्ती वेतनात 25% DR जोडायची मागणी

DR म्हणजे महागाई सवलत 25% पेक्षा जास्त झाल्यावर मूळ निवृत्ती वेतनात विलीन केला जावा, असेही बीपीएसने सुचवले असून यामुळे निवृत्ती वेतनाच्या गणनेत बदल होईल आणि निवृत्तीवेतनधारकांना वाढत्या महागाईच्या परिणामांना तोंड देण्यास मदत होईल. मात्र, निवृत्तीवेतनधारक संघटनेने केवळ मागणी मांडली आहे, आणि याच्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यानंतरच्या सरकारी निर्णयावर अंमलबजावणीचा अंतिम निर्णय अवलंबून असेल.

1955 मध्ये सुरू झालेला भारत पेन्शनर्स समाज एक जुनी आणि नोंदणीकृत संघटना आहे, जी लाखो निवृत्तीवेतनधारक या संस्थेशी संलग्न आहेत.ही संघटना केंद्र सरकारसमोर निवृत्तीवेतनधारकांच्या मागण्या आणि समस्या मांडते.

Maharashtra TimesIT नोटीस येऊ नये म्हणून Savings Account मध्ये किती पैसे ठेवायचे? प्रमाणापेक्षा जास्त असल्यास तुम्ही आयकर विभागाच्या नजरेत याल

किमान निवृत्तीवेतन अन् मूळ वेतनात वाढीचा प्रस्ताव

दिल्लीतील बैठकीत BPS ने किमान निवृत्तीवेतन 45000 रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव दिला असून किमान मूळ वेतन 69000 रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. फिटमेंट फॅक्टरचा उपयोग सध्याच्या वेतन किंवा निवृत्तीवेतनाची नवीन पातळी निश्चित करण्यासाठी केला जातो. या संस्थेने कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी 5.2 भारित एककांचे सूत्र अवलंबण्याचाही प्रस्ताव ठेवला असताना या मागण्यांबाबत निवृत्तीवेतनधारक आणि कर्मचारी यांचे हित लक्षात घेऊन योग्य बदल केले पाहिजे, असेही संस्थेने म्हटले.

Maharashtra TimesAdani US Case: अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; Criminal Case रद्द, लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; तरी लागेल 18 दशलक्ष डॉलर्सचा दंड8 व्या वेतन आयोगाचा अहवाल कधी येणार?

3 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली गेली. तेव्हापासून आता या वेतन आयोगाला केंद्र सरकारला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली असून त्याआधी अंतरिम अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. अशाप्रकारे, मे-जून 2027 च्या सुमारास सादर होणार असल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे.

याआधी आयोग विविध शहरांमध्ये कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि संघटनांशी चर्चा करत असून 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील बैठकांनंतर चेन्नई, पुदुचेरी, चंदीगड आणि जयपूर येथेही बैठका नियोजित आहेत. अशाप्रकारे, अद्याप पेन्शनर्सच्या मागण्या मान्य करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

आठव्या वेतन आयोगाने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात किती वाढ करायची? याबाबत अंतिम निर्णय होईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत