Headlines

मळगावच्या काव्यसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद – Tarun Bharat

न्हावेली | वार्ताहर : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात आयोजित ‘काव्यंजली’ या काव्यसंमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकणी, मालवणी आणि मराठी भाषेतील स्वरचित तसेच निवडक कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. मळगाव इंग्लिश स्कूल व मळगाव हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी पाऊस आणि निसर्ग या विषयांवरील स्वरचित कविता…

Read More

शाळा महाविद्यालय परिसरात गतिरोधक व सूचनाफलक उभारण्याचे पराग चव्हाण यांचे निवेदन

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने गतिरोधक व सूचना फलक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेकडे केली आहे. याबाबत पराग दिपक चव्हाण (रा. माठेवाडा, सावंतवाडी) यांनी नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक शाळांसमोर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका…

Read More

“पश्चिम घाटातील जैवविविधतेला अखेर न्याय मिळण्यास सुरुवात” – डॉ. जयेंद्र परुळेकर

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने २७ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाटासाठी इको सेन्सिटिव्ह एरिया (ईएसए) जाहीर करण्याच्या दृष्टीने अधिसूचना प्रसिद्ध केल्याबद्दल पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम घाटातील जैवविविधतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. डॉ. परुळेकर म्हणाले की, पश्चिम…

Read More

Indian Couple Leaves Plant Pots for Months in America Marathi Womans Story Goes Viral | अमेरिकेत आल्यावर भारतीय लोक विचित्र का वागतात? मराठी महिलेनं केलं एक्सपोझ, ‘कुंड्या ठेवून झाले गायब’

Viral Instagram Video: अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी महिलेने भारतीय जोडप्यासोबतचा विचित्र अनुभव शेअर केला आहे. त्या जोडप्याने तिच्या मैत्रिणीकडे रोपट्यांच्या कुंड्या ठेवण्यासाठी दिल्या. मात्र, सात महिने उलटूनही त्या परत नेल्या नाहीत किंवा साधी ओळखही दाखवली नाही. (फोटो सौजन्य – thethamkefamilyineurope/Instagram) युरोप-अमेरिकेत गेल्यानंतर भारतीय लोकं कधी कधी फारच विचित्र वागतात. असे काही व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिले…

Read More

Money Follows My Brother Ravi Kishans Dialogue Goes Viral Memes Flood Social Media | Memes: ‘मनी फॉलोज माय ब्रदर!’, रवी किशन यांच्यावर मीम्सचा पाऊस, एका वाक्यानं जेन झींना केलं वेडं

Money Follows My Brother Memes: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन सध्या “मनी फॉलोज माय ब्रदर” या डायलॉगमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या डायलॉगवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – imsanj.ai, memerjoshi34/Instagram) प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन सध्या प्रचंड चर्चेत आहेत. किंबहुना, त्यांच्यावर एकापेक्षा एक मजेशीर मीम्स व्हायरल होत…

Read More

मालवणात रोटरी क्लब व लिमये हॉस्पिटलतर्फे बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मालवण येथे Bone Mineral Density (BMD) तपासणीचे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण १५५ रुग्णांची मोफत बीएमडी तपासणी करण्यात आली. हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे…

Read More

सिंधुदुर्गनगरीतील बांधकाम कामगारांचे ‘आक्रोश’ आंदोलन

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बांधकाम कामगारांच्या लाभ योजनांच्या प्रस्तावांबाबत अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत गणेश चतुर्थीपूर्वी ७,५०० अर्ज निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथे मंगळवारी झालेले शेकडो बांधकाम कामगारांचे ‘आक्रोश’ आंदोलन स्थगित करण्यात आले. विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे ३५० ते ४०० नोंदणीकृत…

Read More

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा

पणजी/ विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी अचानक नवी दिल्लीला धाव घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. अमित शहा हे दिनांक सहा व सात सप्टेंबर रोजी गोव्यात येत असून दिनांक 6 सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते रायबंदर येथे उभारण्यात आलेल्या भाजपच्या गोवा मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत…

Read More

आपत्तीकाळात अग्निशामक दलाचे जवान मदतगार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : अग्निशामक दलास 18 अत्याधुनिक वाहने प्रदान त. भा. प्रतिनिधी पणजी : राज्याची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, आपत्ती सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून,    आज अग्निशामक दलाला 18 वाहने देण्यात आली आहेत. अग्निशामक दलाच्या ताफ्यात प्रथमच 42 मीटर उंच शिडी असणारे वाहन सामील…

Read More

भारतीय खेळाडूंचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धा

दिल्लीतील विमानतळावर सर्व खेळाडूंचे जल्लोषात स्वागत वृत्तसंस्था नवी दिल्ली ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीतांचा निनाद, फुलांचे हार आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी अशा उत्साहपूर्ण वातावरणात खेळाडूंचे स्वागत झाले. मात्र, या जल्लोषातही सर्व…

Read More