Headlines

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा


पणजी/ विशेष प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी अचानक नवी दिल्लीला धाव घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. अमित शहा हे दिनांक सहा व सात सप्टेंबर रोजी गोव्यात येत असून दिनांक 6 सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते रायबंदर येथे उभारण्यात आलेल्या भाजपच्या गोवा मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे मंगळवारी अचानक नवी दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गोव्या दौऱ्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले आणि त्यांनी ते स्वीकारले. दिनांक 6 आणि सात सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या भेटीसाठी ते गोव्यात येणार आहेत. सहा रोजी भाजप मुख्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येईल, तर दिनांक सात सप्टेंबर रोजी पश्चिम क्षत्रिय राज्यांची बैठक पणजीत होणार असून या बैठकीत अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत.

 विकासकामांसाठी शहांचे पूर्ण सहकार्य

सायंकाळी दैनिक तऊण भारतशी नवी दिल्लीहून बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले की आपण गोव्यातील विविध विकासकामासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गोव्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

 आदिवासींची मागणी पूर्ण होणार

आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासंदर्भातील मुद्दा आपण त्यांच्यासमोर मांडला असता यावर त्वरित तोडगा काढला जाईल व आदिवासींच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री यांनी दिले. त्यामुळे हा प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

पर्वरी उ•ाणपुलाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

पर्वरी येथे उभारण्यात आलेल्या उ•ाणपुलाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते केले जाणार आहे का असे विचारले असता या पुलाचे उद्घाटन मागाहून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कर्नाटकाच्या कारवाया गोव्याला फायदेशीर

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कर्नाटक सरकारने केवढ्याही कारवाया केल्या किंवा नाटके केली तरी त्याचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलटपक्षी त्यांनी अवश्य केस मागे घ्यावी, फायदा शेवटी गोव्याचा होणार आहे. कर्नाटकातील नेते मंडळी जे काय करीत आहे ते त्यांचे त्यांना तरी माहीत आहे की नाही, याबाबत आपल्याला शंका वाटते. आपली केस मागे घेणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ आणि आम्ही आमची म्हादई आमच्या ताब्यात घेऊ, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.  आपण हा प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर उपस्थित केला का ? असे विचारले असता हा विषय चर्चेला घेतला नाही मात्र गोव्याची स्थिती त्यांनाही माहित आहे. त्यामुळे कर्नाटकाने केवढीही नाटके केली तरी काहीही होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत