Money Follows My Brother Memes: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन सध्या “मनी फॉलोज माय ब्रदर” या डायलॉगमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या डायलॉगवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.

७०० हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम
रवी किशन हे प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत भोजपुरीसोबतच हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ या भाषांमध्ये मिळून तब्बल ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
१९९२ मध्ये केली करिअरची सुरूवात
ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. १९९२ मध्ये पितांबर या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
मिश्कील स्वभावामुळेही लोकप्रिय
रवी किशन हे आपल्या मिश्कील स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलण्याची स्टाइल, आवाजातील चढ-उतार आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स हे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
रवी किशन राजकारणातही सक्रिय
अभिनयासोबतच ते राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार आहेत.
सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत “मनी फॉलोज माय ब्रदर” असं म्हटलं. या वाक्यावरून आता मीम्स व्हायरल होत आहेत. तसेच, काही नेटकऱ्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांवरही मजेशीर मीम्स व्हायरल केले आहेत.

