Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय
मुंबई : बेस्ट उपक्रमाला संचित तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीने बेस्ट आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २२ आगारांचे आधुनिकीकरण करण्यात…
