मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं संबोधल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला असून काँग्रेसच्या कुलाबा येथील गांधी भवन या कार्यालयात धडक देऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षांनीही काँग्रेसच्या या टीकेचा समाचार घेतला. मात्र हा वाद सुरू झाला तो राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या एका कृतीमुळे. सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराकडून सुनेत्रा पवारांना कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र धनंजय मुंडे यांनी त्या पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. हाच व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका केली होती. धनंजय मुंडेंच्या या कृतीवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांनी सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखण्याबाबत आज सुनील तटकरे यांनी विचारलं असता ते म्हणाले की, “मी ती पत्रकार परिषद पाहिली नाही. मात्र ज्यावेळी पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतात यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आमदार पालकमंत्र्यांच्या शेजारी बसतात. हे काय चुकीचं नाही. मात्र ती पत्रकार परिषद त्या महत्त्वाच्या व्यक्तीची असते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माझ्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मी त्यांच्या बाजूला बसलो होतो, पण मी मध्ये बोललो नाही. धनंजय मुंडे कोणत्या संदर्भाने बोलले, हे मी समजून घेईल. महत्त्वाच्या व्यक्तीच्या पत्रकार परिषदेवेळी बाजूला बसणं हे ठीक आहे, पण बाजूला बसून बोलणं, हे योग्य आहे, असं मला वाटत नाही,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंवर नाराजी व्यक्त केली आहे.
टीकेवरून राजकीय वादंग
‘सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील,’ अशी टिप्पणी काँग्रेसकडून व्हिडिओसोबत करण्यात आली. यावर मंगळवारी जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला. पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काही कार्यकर्त्यांसह थेट काँग्रेसचे दादर येथील टिळक भवन गाठून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यावर टीका होऊनही कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून कुठलीही तातडीची प्रतिक्रिया आली नाही. मंगळवारी सायंकाळी या दोन्ही नेत्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून काँग्रेसचा निषेध केला.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला. ‘राज्याची राजकीय संस्कृती इतक्या खालच्या स्तराला जाताना प्रथमच पाहायला मिळाले,’ असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसला खडे बोल सुनावले.
‘गुंगी गुडिया’ ही शिवी नाही- काँग्रेस
काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडीया’ शब्द वापरला, तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते. पण, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा