Headlines

Pune Lohegaon Feviquik Put into 9 Month Old Baby Mouth due to Home Argument; भावजयांमध्ये वाद, वचपा काढण्यासाठी झोपलेल्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले, ओठ चिकटले अन्…; पुण्यात अमानुषपणाचा कळस


Pune Lohgaon Shocking Crime : कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य करण्यात आलं असून या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Lohgaon Shocking Crime (3)
लोहगाव बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं
अभिजीत दराडे, पुणे : ​पुण्याच्या लोहगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घरातील वादाचा राग काढण्यासाठी एका महिलेनं चक्क नऊ महिन्यांच्या निरागस बाळाच्या तोंडात फेविक्विक टाकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या अमानुष कृत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांवर गुन्हा नोंदवला आहे. सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हाल्याळ (वय 48, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​नेमका प्रकार काय?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 31 जुलै शुक्रवारी रोजी कलवड वस्ती (लोहगाव) येथे घडली. याप्रकरणी बाळाचे वडील अल्ताफ नबी शेख यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. अल्ताफ यांची पत्नी जैनाब आणि तिची भावजय सानिया शेख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून खटके उडत होते. ​या रोजच्या भांडणाचा आणि रागाचा वचपा काढण्यासाठीसानियाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. घरात गाढ झोपलेल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला तिने लक्ष्य केलं आणि त्याच्या तोंडात थेट फेविक्विक ओतलं.

31 जुलैच्या दुपारी 12 वाजता चिमुकला अली हा झोपलेला असताना सानिया हिने त्याच्या तोंडात चक्क फेविक्विक ओतलं. थोड्याच वेळात अलीला उलट्या होऊ लागल्या, त्याचे ओठ एकमेकांना चिकटले. ही बाब अलीच्या आईच्या लक्षात येताच तिने फिर्यादी अल्ताफ यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर लगेचच बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्यानं सुदैवाने बाळाची प्रकृती ठीक आहे.

​तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी

मात्र, हे भयंकर कृत्य केल्यानंतरही आरोपी सानियाने आपली चूक मान्य करण्याऐवजी फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी तिने दिली. तसेच, तिच्यासोबत असलेल्या अन्य दोन आरोपींनीही तक्रारदाराला पोलिसांत गेल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा धाक दाखवल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

​बाळाची प्रकृती स्थिर

घटनेचं गांभीर्य ओळखून बाळाच्या आईने क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सुदैवाने, वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे बाळाचे प्राण वाचले असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. ​अल्ताफ शेख यांच्या फिर्यादीवरून लोहगाव पोलिसांनी सानिया शेख व इतर दोन जणांवर तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा