Headlines

Kalyan Rukminibai Hospital Rabies Injection Needle Left in Child Waist Found after X Ray; कुत्रा चावल्याने रेबिजचं इंजेक्शन, सुई चिमुकल्याच्या कमरेतच राहिली, एक्स-रे काढल्यावर प्रकार समोर; कल्याणमधील संतापजनक घटना


KDMC Rukminibai Hospital Hospital : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. रेबीजचं इंजेक्शन देताना अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत सुई अडकली.

KDMC Rukminibai Hospital Hospital
रुक्मिणीबाई रुग्णालय रेबीज इंजेक्शन सुई अडकली
ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारांबाबत आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. अडीच वर्षीय मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आलं. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचं एक्स-रे काढल्यानंतर लक्षात आलं. ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई काढण्यात आली आहे. कुटुंबीयांनी मुलाची तपासणी करून एक्स-रे काढल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी अमित कोलेकर यांनी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे दोघे आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आले होते. मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाला रेबिजचे इंजेक्शन दिलं. मात्र, इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेतराहिली. आई काजल पांडे यांनी सांगितलं की, ‘इंजेक्शनची सुई बाहेर आलेली नाही. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की, ती इकडे तिकडे पडली असेल, तुम्ही मुलाला घेऊन जा’. थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला. आई-वडील मुलाला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याठिकाणी देखील त्यांना आधीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अडकलेली सुई ऑपरेशन करुन काढण्यात आली. या प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. ‘आमच्या मुलासोबत झालं, दुसऱ्या मुलासोबत असा प्रकार व्हायला नको’, असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra TimesMumbai Crime : SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय?

दोषींवर कडक कारवाईची मागणी


दरम्यान, या घटनेनंतररुक्मिणीबाई रुग्णालयातील कामकाजआणि उपचार पद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी अमित कोलेकर यांनी रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन किंवा केडीएमसीकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा