जामनेर बस स्थानकात एकाच दिवशी महिलेची पर्स, सोन्याची पोत लंपास:चोरीच्या घटना वाढल्या; सावधगिरी बाळगण्याची व्यक्त होतेय गरज
येथील बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एकाच दिवशी दोन महिलांना चोरांनी लक्ष्य केले. यात एका महिलेची पर्स लांबवण्यात आली, तर दुसऱ्या ज्येष्ठ महिलेची सोन्याची मंगलपोत चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बस स्थानकात बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाची पर्स चोरट्या महिलेने लांबवली. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…
