रात्रभर शूटिंग करूनही भन्साळींना आवडला नव्हता सीन, छाया कदम यांचा एक सल्ला अन् चित्र बदललं, ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवरचा खास किस्सा
मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण केली आहे. त्या सध्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून गेल्या चार ते पाच वर्षात त्यांना मिळालेल यश हे कौतुकास्पद आहे. आजही अनेक अभिनेत्रींचं स्वप्न असतं ते म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम…
