Milky Mist Success Story Of Satish Kumar ; Success Story : 10 किलो पनीर ते 10,000 कोटींचं साम्राज्य! वयाच्या 16 व्या वर्षी सुरुवात; Amul ला टक्कर देत कशी उभारली Milky Mist?
Milky Mist Success Story Of Satish Kumar ; Success Story : 10 किलो पनीर ते 10,000 कोटींचं साम्राज्य! वयाच्या 16 व्या वर्षी सुरुवात; Amul ला टक्कर देत कशी उभारली Milky Mist?
Milky Mist ची सुरुवात अगदी छोट्या स्तरावरून झाली आहे. सतीश कुमार यांच्या वडिलांचा दुग्ध व्यवसाय होता. Milky Mist ची सुरुवात सतीश यांनी वयाच्या अगदी 16 व्या वर्षी केली. कुटुंबाच्या व्यवसायाची स्थिति फार काही उत्तम नव्हती त्यामुळे सतीश यांनी शाळा सोडली आणि पूर्णपणे व्यवसायात उतरण्याचा निश्चय केला. दुधात मार्जिन कमी मिळत होते त्यामुळे दुधाचे मूल्य वाढवण्यासाठी सतीश यांनी शक्कल लढवली. दुधापासून पनीर तयार केला आणि लोकल हॉटेलमध्ये विकण्यास सुरुवात केले.
सतीश यांनी दुधापासून तयार केलेले पनीर बंगळुरूच्या हॉटेलमध्ये विकण्यात येऊ लागले. सुरुवातीला त्यांनी फक्त 10 किलो पनीर तयार केले होते. जशा मागण्या वाढल्या तशी निर्मिती वाढवण्यात आली आणि इथेच Milky Mist ची पायाभरणी झाली. पुढे फक्त पनीरपुरते मर्यादित न राहता त्यांनी चीज, बटर, दही, ग्रीक योगर्ट, आईस क्रीम तसेच इतर जास्त प्रथिनेयुक्त डेअरी पदार्थांची निर्मिती सुरू केली. साधे दूध न विकता ग्राहकांना दुधापासून बनलेले पदार्थ विकण्याची सतीश यांचीही शक्कल मोठ्या व्यावसायिक साम्राज्याला आकार देऊ लागली. त्यांच्या व्यवसायाने दक्षिण भारताचे दुग्धबाजारात पकड तयार केली.
अशात ग्राहकांनाही दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची चटक लागू लागली. बाजारात ग्रीक योगर्ट, साधे योगर्ट तसेच उत्कृष्ट दर्जाच्या चीजला मागणी वाढू लागली आणि याच मागणीमुळे बाजारात Milky Mist ला विशेष स्थान मिळाले.
US Bond Yield: अमेरिकेत शेअर मार्केट बुडणार असल्याचा तज्ज्ञांचा इशारा, खरंच असं घडलं तर भारतावर कितपत परिणाम होईल?आजच्या घडीला Milky Mist चा एकूण महसूल 3,145 कोटी इतका आहे. तर यंदाच्या वर्षातील कंपनीचा एकूण नफा 127.01 कोटी इतका आहे. तसेच कंपनीने नुकतेच आयपीओ आणले होते. Temasek तसेच आयएफसी आणि एफडीएफसी म्यूचुअल फंड कंपन्यांनी Milky Mist आयपीओ लिस्ट होण्यापूर्वीच खरेदी केली होती. आयपीओ लिस्ट होण्यापूर्वीच शेअरला 465 कोटींची गुंतवणूक मिळाली. आयपीओची एकूण किंमत 140 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती, आयपीओ लिस्ट झाल्यावर किंमत 181.50 प्रति शेअर्स गेली. कंपनीने जितके शेअर्स विक्रीसाठी ठेवले त्याच्या 2.17 पटीने जास्त मागणी करण्यात आली. शेअर्सच्या वाढत्या मागणीमुळे आज या कंपनीचे मूल्य जवळपास 14,000 कोटींवर पोहचले आहे. तसेच दक्षिण भारतातील या व्यावसायिक साम्राज्याने आता संपूर्ण भारतभरात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.
त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.… आणखी वाचा