आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत छाया कदम यांनीसंजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ज्या अभिनेत्रींनी आतापर्यंत संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केलंय, त्यांनी वेगवेगळे अनुभव शेअर केलेत. आता छाया यांनी सांगितलेला किस्साही चर्चेत आलाय.’गंगूबाई काठियावाडी’ या सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगताना त्यांनी भन्साळींच्या कामाच्या पद्धतीवर आणि त्यांच्या परफेक्शनिस्ट असण्यावर प्रकाश टाकला.
रात्रभर शूटिंग करूनही भन्साळींना सीन आवडला नाही
मुलाखतीदरम्यान छाया कदम यांना विचारण्यात आलं की, कलाकारानं आधीच तयारी करून गेल्यावर ऐनवेळी सीनमध्ये बदल झाले आहेत का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, हो, बऱ्याचदा असं घडतं. आम्ही कलाकार घरी तयारी करून जातो, पण सेटवर गेल्यावर अनेकदा गोष्टी वेगळ्या पद्धतींनी घडत असतात.
Usha Nadkarni Life Story: वडिलांनी केला कोयत्यानं हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, मुलगा आजही आई मानत नाही; ८० व्या वर्षी एकाकीपण,अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या आयुष्यात घडलंय बरंच काही
‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवरील किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की, एका सीनमध्ये मी स्वयंपाक बनवत असते आणि दुसरी मुलगी येऊन माझ्याशी बोलते, असा प्रसंग होता. आम्ही पूर्ण रात्रभर या सीनचं शूटिंग केलं, पण संजय सरांना तो सीन काही केल्या आवडतच नव्हता. त्यानंतर पुन्हा दोन -तीन दिवसांनी तोच सीन शूट करायचं ठरलं. यावेळी एक गोष्ट लक्षात आली की, भन्साळी हे कलाकारांच्या मतांचाही आदर करतात, त्यांचे सल्लेही ते ऐकतात. या सीनबद्दल भन्साळींनी मला आणि टीममधील इतरांना विचारलं की, आणखी काय करता येईल. तर झालं असं होतं की, माझी भूमिका ही एका अशा महिलेची होती, जी सगळ्यांना हुकूम देते. तर मी स्वयंपाक करू? त्या ऐवजी माझ्यासोबत असलेल्या मुली बनलतील आणि मी बसलेली असेन, काही मुली माझ्या डोक्याचा मसाज करतील. असं मी त्यांना सांगितलं. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि आम्ही तो सीन शूट केला.
आपल्या हक्काचा पुरस्कार दुसऱ्यांना मिळाला की वाईट वाटतं, छाया कदम यांची खंत
तर संजय लीला भन्साळी हे एक उत्कृष्ट दिग्दर्शकच नाहीत, तर ते नृत्य दिग्दर्शक आणि संगीतकारही आहेत, ते खऱ्या अर्थानं अष्टपैलू आहेत, असंही छाया कदम यांनी म्हटलं.
