Rahul Gandhi Pune Visit: या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

‘आरटीओ’जवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार असून, त्यासाठी सुमारे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक; तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात असतील. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि पार्किंग व्यवस्थेवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
Pune News : पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी तणाव, ABVP आणि NSUI भिडलेविद्यापीठात ‘युवा की आवाज’
युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासोबतच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’ यांच्या वतीने ‘युवा की आवाज’ या विशेष कार्यक्रमाचे आज, शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सायंकाळी पाच वाजता संपूर्ण वंदे मातरम् चे सामूहिक गायन; तसेच देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
Pune News : पुण्यात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; भाजप नेत्यांवर टीका करणाऱ्या बालवडकर-टिंगरेंचा निधी शून्य‘अभाविप’- ‘एनएसयूआय’ वाद
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूँज’ या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. आज, शनिवारी सायंकाळी गांधी यांचा ‘छात्रों की गूँज’ हा कार्यक्रम होणार आहे. सीओईपी वसतिगृहात शिरून ‘एनएसयूआय’ कार्यकर्ते कार्यक्रमाला येण्यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करीत आहेत. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यासाठी धमकावण्यात आले, असा आरोप ‘अभाविप’ कार्यकर्त्यांनी केला, तर ‘अभाविप’चे कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना धमकावल्याचा, राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. त्यानंतर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांनी संवाद साधला. काँग्रेस-अभाविपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

