पुण्यात अश्वारूढ तिरंगा यात्रा, क्रांतिकारकांना अभिवादन:क्रांतिदिनी दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे प्रथमच आयोजन
पुण्यात क्रांतिदिनानिमित्त अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे आयोजित या संचलनातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीला अश्वारोहकांनी अभिवादन केले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून या अश्वारूढ संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस…
