Headlines

विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे, शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्याची देवदत्त कामतांची मागणी – shivsena-party-symbol-verdict-devdatt-kamat-argument on 20 aug


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह वादाच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचा युक्तिवाद मांडला. शिवसेना फुटीनंतर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेत जाऊन अपात्र ठरवू शकतो का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. त्यावर आता ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी मोठा युक्तिवाद केला आहे. अपात्र ठरल्यानंतर आमदारांनी आधीच पक्षांतराचे फायदे उपभोगले आहे, आणि आता वेळ न घालवता खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच या आमदारांच्या अपात्रतेवर थेट निर्णय घ्यावा, अशी थेट मागणी कामत यांनी कोर्टात केली. आज कामत यांनी कोर्टात काय काय महत्त्वाचे मुद्दे मांडले? न्यायाधीशांनी त्यांना काय उत्तर दिले? आणि जुन्या निकालांचा कसा संदर्भ दिला? हेच आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत