आयुष्यमान कार्ड नावाप्रमाणेच नागरिकांना आयुष्याला बळ देणारे आहे. परंतु, हे कार्ड वापरण्यासाठीही अनेक अटी आणि शर्ती आहेत. हे कार्ड कुठे वापरायचे? कधी वापरायचे? आणि कशासाठी वापरायचे? या प्रत्येक मुद्यासाठी काही नियम आहेत. त्यामुळे जर तुम्ही पूर्णपणे आयुष्यमान कार्डाच्या विश्वासावर असाल तर जरा जपून. आधी हे कार्ड वापरण्यासंदर्भात असणाऱ्या नियमांशी परिचय करून घ्या. आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंतच्या उपचारात सवलत मिळू शकते. परंतु हे 5 लाख फक्त प्रत्येक कुटुंबाला दिली जाणारी वार्षिक सवलत आहे. त्यामुळे, कुटुंबातील प्रत्येकासाठी 5 लाख असा विचार करून चालू नका. जर कुटुंबातील एका व्यक्तीला काही कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या उपचारादरम्यान आलेला खर्च 3 लाख असेल तर त्या कुटुंबाच्या आयुष्यमान कार्डात चालू वर्षासाठी फक्त 2 लाखांची रक्कम बाकी राहते. त्याच वर्षात जर कुटुंबातील आणखीन एक सदस्य रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्या उपचारवर खर्च 4 लाख आला तर कुटुंबाला 2 लाख स्वतःच्या खिशातून टाकावे लागतात.
70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आयू असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची अट लागू नाही. परंतु, उपचारासाठी ज्या रुग्णालयाची निवड करण्यात येते, ते रुग्णालय आधी आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत येते का? हे तपासून घेणे जास्त महत्वाचे आहे. देशातील प्रत्येक रुग्णालयात आयुष्यमान कार्डाचा वापर होत नाही. फक्त 36,218 रुग्णालयांमध्ये आयुष्यमान कार्ड स्वीकारले जाते. त्यातील 16,559 रुग्णालय खाजगी आहेत तर 19,659 सरकारी रुग्णालय आहेत.
जर तुम्ही एखाद्या आयुष्यमान कार्ड स्वीकारल्या जाणाऱ्या रुग्णालयात दाखल झालात तरी तुम्ही घेत असलेले उपचार या योजनेअंतर्गत येते का? हे तपासून घेणेही फार महत्वाचे आहे. कारण आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत काही ठराविकच उपचारांना समाविष्ट केले गेले आहे. प्रत्येक उपचारासाठी आयुष्यमान कार्ड वापरता येत नाही. त्यामुळे, आधी तुमच्यावर करण्यात येणारा उपचार या योजनेअंतर्गत नोंद आहे का? ते आधी तपासून घ्या.
कोणकोणत्या उपचारांसाठी आयुष्यमान कार्ड स्वीकारले जात नाही?
विविध कॉस्मेटिक उपचार, Fertility Treatment किंवा किरकोळ आजारासंबंधीत वैद्यकीय सल्ल्यासाठी आयुष्यमान कार्ड स्वीकारले जात नाही. या योजनेत एकूण 1961 उपचारपद्धती तसेच 27 मेडिकल स्पेशालिस्ट पद्धती समाविष्ट आहेत. या योजनेत ओपीडीचा खर्च येत नाही.
8th Pay Commission लागू होण्याआधीच केंद्रीय अधिकाऱ्यांसाठी आनंदवार्ता! प्रमोशनविना मिळणार बंपर पगार, कसा वाढेल पगार?जर तुम्हाला तुमच्या परिसरातील रुग्णालय किंवा तुम्ही घेत असलेली उपचारपद्धती या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे का? हे तपसायचे असल्यास Ayushman App डाउनलोड करण्यात यावा. त्यावरून अर्जकर्त्याला पात्रता तसेच योजनेत समाविष्ट आजार आणि रुग्णालयांची यादी तपासात येते. येथून आयुष्यमान ई-कार्डही डाउनलोड करता येते. आयुष्यमान कार्डला लाभ घेण्यापूर्वी तुम्ही घेत असलेला उपचार, जिथे उपचार घेणार आहात तो रुग्णालय आणि सगळ्यात अगोदर ‘तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का?’ या गोष्टी तपासून घ्या.
लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.
त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.… आणखी वाचा