Headlines

तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं वाद, राजकीय पडसाद; सावजीचा इतिहास अन् हलबा समाज आक्रमक का झाला? – tukaram mundhe saoji food controversy reaction explained


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#tukarammundhe #saojifood #halbacommunityअमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी बद्दल वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं. या कार्यक्रमात तुकाराम मुंढे म्हणाले,”आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ‘स्पायसी जेवण द्या’ अशी मागणी करतो. तर्री मागतो. नागपूरला गेल्यावर सावजी मागवतो. माझ्यासारख्या व्यक्तीने ते खाल्ले तर मी एक महिना हॉस्पिटलमध्ये जाईन. अशा प्रकारचे ऑयली,फॅटी, सॉल्टी, शुगरी अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर खातो यामुळे हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरे काय होणार?” असे मुंढे म्हणाले. या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाला. सावजी नेमका प्रकार काय आहे, शेफ आणि डॉक्टर याबद्दल काय म्हणतात यासोबतच राजकीय वर्तुळात याचे पडसाद कसे उमटले आहेत आणि तुकाराम मुंढेंनी यावर काय उत्तर दिलंय. याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत