Headlines

हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताच्या वाघांकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम, आता पुढील आव्हान कसे असणार? जाणून घ्या


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Hocky Match Result INDvsPakistan News : हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानचे आव्हान संपले असून भाराताचा पुढचा प्रवास कसा असणार आहे जाणून घ्या.

IND vs PAK Hocky
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने पाकिस्तानवरील दशकभराचे वर्चस्व वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेतही कायम ठेवले. भारताने पाकवरील वर्चस्व ३८४२ दिवसांपेक्षाही जास्त राहील ही काळजी घेताना पारंपारीक प्रतिस्पध्र्थ्यांना ५-३ असे पराभूत केले. यामुळे पाकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यावर आता भारतासाठी पुढचे आव्हान काय असणार आहे? जाणून घ्या.

भारतासमोर आता काय ?

पाकिस्तानवरील विजयामुळे भारत ड गटात दुसऱ्या स्थानी गेला आहे. या कामगिरीमुळे भारत अव्वल साखळीसाठी पात्र ठरला आहे. भारत आणि इंग्लंडची लढत अ गटातील अव्वल दोन संघांविरुद्ध होणार आहे. अ गटातून नेदरलँड्सची आगेकूच निश्चित; अर्जेंटिना आणि न्यूझीलंडमध्ये गटउपविजेतेपदासाठी चुरस होईल. इंग्लंडने वेल्सला ८-२ असे हरवून गटविजेतेपद निश्चित केले. अव्वल साखळीत तीन गुण आणि दोन गोलांच्या अनुकूल फरकाचा लाभ; भारताविरुद्ध ३-१ विजयाचा फायदा झाल आहे.

Maharashtra TimesIND vs SL : भारताकडून १६५ धावांनी पराभव; श्रीलंकेच्या हातून कुठे निसटली मॅच? भावुक कॅप्टन डी सिल्वाने सगळं सांगितलं

पाकची पीछेहाट

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान गटात तिसरे राहिले आहेत. पाकिस्तानला स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही. भारत आणि इंग्लंडकडून पराभव, दुबळ्या वेल्सविरुद्ध बरोबरी साधली आहे. १९९४ नंतर पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत एकही पदक नाही. १९९४ मध्ये पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली होती; त्यानंतर सातत्याने कामगिरी खालावली. २०१४ आणि २०२३ च्या स्पर्धेसाठी पाकिस्तान पात्र ठरू शकला नव्हता. गतस्पर्धेत प्राथमिक गटात तिसरे यंदा त्यापेक्षाही खराब कामगिरी ठरली आहे.

भारत-पाक हॉकी सामन्याचा आढावा

हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हरमनप्रीतने ५व्या आणि २१व्या मिनिटाला, तर अभिषेकने ११व्या आणि २४व्या मिनिटाला गोल केले. हार्दिक सिंगने ३४व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल नोंदवला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने २२व्या आणि ४६व्या मिनिटाला, तर सुफियान खानने २४व्या मिनिटाला गोल करत प्रतिकार केला. भारताने पहिल्या २१ मिनिटांत तीन गोल करत सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर पाकिस्तानने चांगले आव्हान उभे केले; मात्र भारताने किमान दोन गोलांची आघाडी राखत विजय निश्चित केला..

भारताने जूनमधील प्रो लीग लढतींमध्येही पाकिस्तानला ७-१ आणि ४-३ असे पराभूत केले होते. या सामन्यात पाकिस्तानने उत्तरार्धात तुलनेने चांगला प्रतिकार दाखवला; मात्र भारताच्या आक्रमणाची धार आणि बचावातील शिस्त त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.

Maharashtra TimesIND vs SL : चालू सामन्यात यशस्वीची श्रीलंकेच्या खेळाडूला IPL खेळण्याची ऑफर अन् पुढच्या बॉलवर विकेट, Video एकदा पाहाचदोन्ही संघांनी चांगला खेळ केला. आता अव्वल साखळीसाठी तयारी सुरू होईल. त्या टप्प्यातील प्रतिस्पर्ध्यांची कामगिरी पाहूनच व्यूहरचना ठरेल. गतस्पर्धेपेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य आमच्यासमोर असल्याचं भारतीय हॉकीपटू अभिषकने म्हटलं आहे.