Headlines

Vihan Shrivastav dies in Chembur School Bus Tree Accident Cricket Ball besides Body Family bids Farewell Crime News; आमचं बाळ आता परत येणार नाही… विहानच्या पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, पाऊसही धाय मोकलून रडला


Chembur Tree fell on School Bus : अंत्यसंस्कारापूर्वी विहानची आई जुही श्रीवास्तव शोकाकुल अवस्थेत घरी शांत होत्या; त्या आपल्या मुलाची क्रिकेटची बॅट उराशी घट्ट कवटाळून होत्या, तर विहानच्या पार्थिवाशेजारी त्याचा आवडता क्रिकेटचा चेंडू ठेवत कुटुंबाने त्याला अखेरचा निरोप दिला

Vihan Srivastav Chembur School Bus Tree Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय… “मला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा” चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर रस्त्याच्या कडेला असलेले झाड शाळेच्या बसवर पडून मृत्यू पावलेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होत असताना, ज्ञानप्राप्ती आणि शांतीसाठीचा हा प्राचीन संस्कृत मंत्र निनादत होता. शोकाकुल श्रीवास्तव कुटुंबाचे मित्र आणि नातेवाईक त्यांच्याभोवती जमले होते, यावेळी अशा जीवघेण्या घटनांसाठी प्रशासकीय जबाबदारीच्या अभावाबद्दलचा संताप स्पष्टपणे जाणवत होता.

‘कुकरेजा हाईट्स’ येथील निवासस्थानापासून रुग्णवाहिकेपर्यंत अंत्ययात्रा निघाली. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये अभियंता असलेले विहानचे वडील अत्यंत संयमाने पुढे चालत होते, त्याच वेळी विहानची आई, तसेच इतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या आक्रोशाने ती वसाहत दुमदुमून गेली होती.

लेकाची बॅट घट्ट धरुन बसलेली आई

अंत्यसंस्कारापूर्वी विहानची आई जुही श्रीवास्तव या शोकाकुल अवस्थेत घरी शांत बसल्या होत्या; त्या आपल्या मुलाची क्रिकेटची बॅट घट्ट धरून होत्या आणि त्यांच्या भोवती नातेवाईक व शेजारी जमले होते. त्यांची ती शांतता शब्दांत न मांडता येण्याजोग्या अतीव दुःखाची साक्ष देत होती.
Maharashtra TimesAjinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव

पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवून निरोप

देवनार पाडा स्मशानभूमीत चितेला अग्नी देण्यापूर्वी काही क्षण आधी, कुटुंबीयांनी विहानच्या पार्थिवाशेजारी एक क्रिकेटचा चेंडू ठेवला. क्रिकेटची प्रचंड आवड असलेल्या मुलाला दिलेला हा अखेरचा निरोप होता.

आजोबा आठवणीत रमले

“मी त्याला बॅट बॉल आणून दिला होता. तो उत्तम खवय्याही होता” असे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील वकील असलेले त्याचे आजोबा एस एन श्रीवास्तव यांनी सांगितले. अभिमानाने सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. “तो हनुमान चालीसा जशीच्या तशी पूर्णपणे तोंडपाठ म्हणू शकत असे.”

या घटनेबाबत आपण तक्रार दाखल करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. “मी तक्रार नक्कीच करेन, पण ती तक्रार कोणीतरी हाती घेतली पाहिजे आणि त्यावर योग्य ती कारवाई होईल याची खात्री केली पाहिजे” असे ते म्हणाले.

Vikram Pachpute | मुद्दा सर्पदंशाचा, विक्रम पाचपुतेंकडून राज ठाकरेंला बिनविषारी आणि फुसका साप उल्लेख

आमचं बाळ आता परतणार नाही

“आमचं बाळ आता परत येऊ शकत नाही,” असे दिल्लीहून आलेले विहानचे चुलत आजोबा आणि लोकसभेचे निवृत्त अतिरिक्त सचिव अनिल श्रीवास्तव म्हणाले. “कोणतीही नुकसानभरपाई पुरेशी ठरणार नाही. आमचा विहान त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तो आता आमच्यात नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागरी कामांसाठी निधीची तरतूद केली जाते; त्याचा योग्य वापर व्हायला हवा. धोकादायक झाडे आणि उघड्या मॅनहोल्सबाबत काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरुन आम्हाला ज्या वेदनादायी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, तसा त्रास इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावा लागणार नाही.” असे ते पुढे म्हणाले.

अखेरीस, विहानच्या चितेचा धूर देवनारमधील स्मशानावरील राखाडी आकाशाच्या दिशेने वर जात असतानाच, वर असलेल्या एक्झॉस्ट यंत्रणेने त्यातील बराचसा धूर ओढून घेतला आणि मागे उरला तो केवळ पावसाचा ओला गंध. नातेवाईक आणि शेजारी अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी रांगेने पुढे जात असताना कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या आधाराने एकत्र उभे होते.
Maharashtra TimesVenkatesh Doppalapudi : हॅलो, इथे एक गाडी बुडतेय, त्यात एक माणूसही आहे; फोन येताच यंत्रणांची धावाधाव, मुसळधार पावसाने आयटी कर्मचाऱ्याचा जीव घेतला
कुटुंबाचे शेजारी विनोद मल्होत्रा यांना विहानची आठवण झाली; अपघाताच्या काही दिवस आधीच त्यांची त्याच्याशी भेट झाली होती. “मी त्याला त्याचे वय विचारले, तेव्हा तो हसून म्हणाला, ‘अकरा.’ मी त्याला म्हणालो, ‘तू तर खूप उंच झाला आहेस.’ इतक्या कमी काळात त्याची झालेली वाढ पाहून मला आश्चर्यच वाटले. तो खूपच प्रेमळ आणि छान मुलगा होता” असे ते म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा