Headlines

राहुलचा शॉट थेट हेल्मेटवर, तपासणीनंतर मदुष्का बाहेर; फिजिओ ‘कन्कशन टेस्ट’ नेमकी कशी करतात? अज्जूने सगळं सांगितलं


Concussion Test Rule In Cricket : केएल राहुलचा वेगवान स्वीप थेट निशान मदुष्काच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर झालेल्या कन्कशन टेस्टमध्ये फिजिओ खेळाडूला नेमके काय प्रश्न विचारतात, याबाबत अजिंक्य रहाणेने महत्त्वाची माहिती दिली.

Concussion Test Rule in Cricket
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड घट्ट केली आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या दिवशी भारताने युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ९ बाद ४६० धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. मात्र, या मोठ्या धावसंख्येसोबतच काल भारतीय डावादरम्यान घडलेली एक काळजाचा ठोका चुकवणारी घटनाही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. केएल राहुलचा एक अत्यंत वेगवान शॉट थेट श्रीलंकेचा क्षेत्ररक्षक निशान मदुष्काच्या हेल्मेटवर आदळला. या घटनेनंतर क्रिकेटमधील ‘कन्कशन रुल’ (Concussion Rule) पुन्हा चर्चेत आला असून, भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी ‘ती’ घटना

भारतीय डावाच्या १० व्या षटकात श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या गोलंदाजी करत असताना केएल राहुलने एक जोरदार स्वीप शॉट खेळला. शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या निशान मदुष्काला चेंडूचा वेग इतका जास्त होता की स्वतःला सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्याने केवळ डोके खाली झुकवले आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटच्या मध्यभागी आदळला. राहुलने तात्काळ खेळाडूवृत्ती दाखवत मदुष्काकडे धाव घेतली व त्याची विचारपूस केली. यानंतर श्रीलंकेच्या संघाचे फिजिओ तातडीने मैदानात आले आणि त्यांनी मदुष्काची ‘कन्कशन टेस्ट‘ केली. सुरक्षेचा उपाय म्हणून त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले.

Maharashtra TimesDevdutt Padikkal Record : द्रविडने केलं, पुजाराने केलं, आता पडिक्कलचाही ‘वन मॅन शो’, श्रीलंकेविरुद्ध 9 वर्षांनंतर कोणता मोठा विक्रम?

अजिंक्य रहाणेने सांगितला ‘कन्कशन टेस्ट’चा अनुभव

या घटनेनंतर कॉमेंट्री करताना अजिंक्य रहाणेने क्रिकेटमध्ये नव्याने आलेल्या ‘कन्कशन रुल’ आणि खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. डोक्याला चेंडू लागल्यावर फिजिओ नक्की काय तपासतात, हे सांगताना रहाणे म्हणाला, “जेव्हा फिजिओ मैदानात येतात, तेव्हा ते लहान मुलांसारखे अत्यंत साधे प्रश्न विचारतात. जसे की, सध्या कोणता सामना सुरू आहे? आपण कुठे खेळत आहोत? आतापर्यंत किती षटके झाली आहेत? तुम्हाला सध्या काय दिसत आहे? संघाच्या आणि फिजिओच्या दृष्टीने खेळाडूची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. डोक्याला चेंडू लागणे अत्यंत गंभीर असू शकते, त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने सर्व काही ठीक आहे ना, हे तपासणे खूप गरजेचे असते.”

Maharashtra TimesKambli Web Series : सचिनचा जीवलग ते मैत्रीतील दुरावा; ‘कांबळी’चं वादळी आयुष्य आता OTTवर, भूमिकांबाबत उत्सुकता, कुठे पाहता येणार?

रहाणेने यावेळी एका फलंदाजाच्या दृष्टिकोनातूनही परिस्थिती समजावून सांगितली. तो म्हणाला, “जेव्हा फिजिओ मैदानावर येतात, तेव्हा अनेकदा खेळाडूला वाटते की, ‘हे आता इथे का आलेत? मी तर एकदम ठीक आहे!’ कारण खेळाडू सामन्याच्या ‘फ्लो’मध्ये असतो. त्याची मानसिकता पूर्णपणे वेगळी असते आणि संघासाठी खेळणे हेच त्याच्यासाठी त्यावेळी सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याला हे प्रश्न नकोसे वाटतात.”

श्रीलंकेला मिळणार का ‘कन्कशन सबस्टिट्यूट’?

निशान मदुष्का हा श्रीलंकेचा महत्त्वाचा सलामीवीर आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू डोक्याच्या दुखापतीमुळे पुढे खेळू शकणार नसेल, तर संघाला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ (बदली खेळाडू) खेळवण्याची मुभा मिळते. जर मदुष्का फलंदाजीसाठी तंदुरुस्त ठरला नाही, तर श्रीलंकेला त्याच्या जागी दुसऱ्या फलंदाजाला मैदानात उतरवण्याची परवानगी मिळू शकते.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा