Headlines

Tukaram Mundhe FDA Show Cause notice to Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff over Vimal Elaichi Pan Masala ad; अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफला तुकाराम मुंढे यांचा दणका, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस


Vimal Elaichi Pan Masala ad : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील ‘एफडीए’ने बॉलिवूड अभिनेत्यांना दणका दिला आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Tukaram Mundhe FDA Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) बॉलिवूड अभिनेत्यांना दणका दिला आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची अप्रत्यक्ष जाहिरात (सरोगेट ॲडव्हर्टायझिंग) केली जात असल्याचा आरोप एफडीएने त्यांच्यावर केला आहे.

राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री आणि प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र एफडीएने कारवाई तीव्र केली असून आता हे तीन अभिनेतेही प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेते एफडीएच्या रडारवर

या आठवड्यात बजावण्यात आलेल्या नोटिशीद्वारे अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना या जाहिरातीतील त्यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. एफडीएच्या मते, ही जाहिरात ‘विमल पान मसाला’ ब्रँडशी संबंधित असून ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (एफएसएस) अंतर्गत तंबाखूजन्य उत्पादनांची अप्रत्यक्ष जाहिरात ठरु शकते.

Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना 10-15 वर्ष तर FDA मध्ये ठेवू शकत नाही, योगेश कदमांची खंत, आयुक्तांच्या बदलीच्या चर्चांवर मोठं भाष्य

विमल ब्रँडचा प्रसार करणारी जाहिरात

नोटिशीत म्हटले आहे की, “संबंधित जाहिरातीची तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून येते की, ही जाहिरात ‘विमल’ ब्रँडचा प्रसार करते. हा ब्रँड प्रामुख्याने ‘पान मसाला’शी संबंधित आहे. याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित आहे. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी एफएसएस कायदा, २००६ च्या कलम ३०(२)(ए) अन्वये १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केल्याप्रमाणे, हा प्रतिबंध एका वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे.”

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग तपासणीची पहिलीच वेळ

एफडीएने सांगितले की, अप्रत्यक्ष जाहिरातींची (सरोगेट ॲडव्हर्टायझिंग) तपासणी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. या प्रकरणात जाहिरातीचे सादरीकरण, संवाद, उत्पादनाचे नाव आणि बाजारातील संदर्भ यांमुळे, प्रतिबंधित तंबाखू-संबंधित उत्पादनाचा हा अप्रत्यक्ष किंवा सरोगेट प्रसार आहे का, यावर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हे तिन्ही अभिनेते ‘ब्रँड एन्डॉर्सर’ म्हणून या जाहिरातीत सहभागी झाले होते.

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी

महाराष्ट्रात २०१२ पासून तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घालण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए तंबाखूची विक्री आणि प्रसार रोखण्यासाठी कठोर कारवाई करत आहे.

तसेच, एफडीए तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याविरुद्ध कडक पावले उचलत आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका) लागू करण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून कारवाई केली जात आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सानियामकाने ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ मधील कलम २४ लागू केले आहे, जे अन्नाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर निर्बंध घालते. तसेच त्यांनी कलम ५३ चाही संदर्भ दिला आहे. या कलमानुसार, अन्नाबाबतची दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.