Headlines

Ashram School Tribal Students Uniform Distribution in Presence of Tribal Minister Dr Ashok Uike; ‘मटा’ इम्पॅक्ट; आदिवासी विभाग नरमला, अखेर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, नेमकं प्रकरण काय?


Nashik Tribal Students Uniform Distribution : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना अखेर गणवेशवाटप करण्यात येत आहेत. आदिवासी विभागाकडून दिव्यांग संस्थेला पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे.

Nashik Tribal Students Uniform Distribution
आदिवासी विद्यार्थी गणवेशवाटप प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
विनोद पाटील, नाशिक : राज्यातील ४९७ आश्रमशाळांमधील २.२५ लाख विद्यार्थ्यांना सोलापूरस्थित दिव्यांग संस्थेमार्फत शालेय गणवेश खरेदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही टाळाटाळ करणारा आदिवासी विभाग अखेर नरमला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने यासंदर्भातील वृत्त मालिका प्रसिद्ध केल्यानंतर आदिवासी आयुक्तालयाने संबंधित जगदंबा रेडिमेड ड्रेसेस या संस्थेला कार्यारंभ आदेश दिला. त्यामुळे अमरावती व नागपूर अपर आयुक्तालयातील विद्यार्थ्यांना वर्षभरानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत गणवेशवाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना गणवेश व नाइट ड्रेस मिळाले नाहीत

आदिवासी विभागाच्या राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी पहिल्या दिवशी दोन शालेय गणवेश, नाइट ड्रेस, वह्या, पुस्तके, दप्तर, बूट या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश व नाइट ड्रेस मिळाले नाहीत. सन २०२४-२५ या वर्षात सोलापूरस्थित दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या जगदंबा रेडिमेड ड्रेसेस या संस्थेकडून शासनाच्या थेट दरनिश्चिती धोरणानुसार गणवेश व नाइट ड्रेसची ११५ कोटींची खरेदी करण्यात आली. परंतु, या खरेदीला विभागातील ठेकेदारांनीच उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने गणवेश खरेदी रखडली.
Maharashtra TimesVihan Shrivastav : आमचं बाळ आता परत येणार नाही… विहानच्या पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवला, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, पाऊसही धाय मोकलून रडला
विभागाने काढलेली निविदाप्रक्रियाही वादाच्या भोवऱ्यात सापडली. संबंधित संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने संबंधित संस्थेला गणवेशपुरवठा करण्याचे आदेश दिले. परंतु, मंत्रालयातील ‘बाबूं’नी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही धुडकावल्याने २०२६-२७ वर्षाच्या पहिल्या दिवशी नाशिक व ठाणे अपर आयुक्तालयातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशोत्सव साजरा करावा लागला. ‘मटा’ने ‘ठेकेदार सुपात, विद्यार्थी जात्यात’ या वृत्त मालिकेद्वारे वास्तव उघडकीस आणले होते. त्याची गंभीर दखल घेत विभागाने संबंधित संस्थेला गणवेश पुरवठ्याबाबत कार्यारंभ आदेश दिला असून, गणवेशवाटप सुरू करण्यात आले आहे.
Maharashtra TimesCrime News: दारूच्या नशेत राजू पत्नीला नको नको ते बोलला, नंतर ३ मित्रांनी बदला घेतला; वहिनीच्या अपमानानंतर काय घडलं?

विभागाला उशिराचे शहाणपण

राज्यातील नाशिक, ठाणे अपर आयुक्तालयातील आश्रमशाळा १५ जूनला तर, अमरावती, नागपूर आयुक्तालयातील आश्रमशाळा ३० जूनला सुरू होतात. मंत्रालयातील ‘बाबूं’च्या आडमुठ्या धोरणामुळे नाशिक, ठाणे अपर आयुक्तालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव गणवेशाविना झाला. मात्र, ‘मटा’च्या वृत्त मालिकेमुळे अमरावती, नागपूर अपर आयुक्तालयातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळाले. मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते गणवेशवाटप करण्यात आले. विभागाला उशिरा का होईना शहाणपण सुचल्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाल्याचा आनंद मिळाला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा