Ashwin Mushran Accident In Goa : बॉलिवूड अभिनेता अश्विन मुश्रानच्या गाडीनं दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघतात दुचाकीस्वराचे वडील जखमी झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘फॅशन’ आणि ‘देसी बॉईज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता अश्विन मुश्रान गोव्यातील एका रस्ते अपघातावरून वादात सापडला आहे. चुकीच्या दिशेनं गाडी चालवून मोटारसायकलवरून जाणाऱ्या वडील आणि मुलाला धडक दिल्याचा आरोप अभिनेत्यावर आहे. अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी प्रत्यक्षदर्शींसोबत वाद घालताना दिसत आहेत.
चुकीच्या दिशेनं गाडी चालवल्याचा आरोप
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, हा अपघात १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास गोव्यातील कुसमान येथे झाला. अश्विन मुश्रानची कार चुकीच्या दिशेनं येत होती आणि वडील व मुलाला घेऊन जाणाऱ्या बाईकला धडकली. पण, अपघात कसा घडला आणि चूक कोणाची होती याचा तपशील अद्याप कळलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर, अश्विन मुश्रान आणि त्यांच्या पत्नीनं दुचाकीस्वाराला दोष दिला आणि त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांशी त्यांचा वाद झाला. स्थानिक नेते अमोल काणेकरही तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या दोघांना अपघातासंदर्भात जाब विचारला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी लोकांसोबत जोरदार वाद घालताना दिसत आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली दिसत आहे.
‘इन गोवा 24×7’ सोबत बोलताना, नेते अमोल काणेकर यांनी अपघातासंदर्भात अनेक आरोप केले. त्यांच्या दाव्यानुसार, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यांनी असाही आरोप केला की, पीडित व्यक्तीच्या हाडाचा एक तुकडा अश्विन मुश्रानच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या वरच्या टायरच्या फेंडरमध्ये अडकलेला आढळला. काणेकर यांनी असाही दावा केला की, अपघातानंतर लगेचच माफी मागण्याऐवजी अश्विननं तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी वाद घातला. त्यानंतर तो अभिनेता एका पार्टीला जाण्यासाठी घटनास्थळावरून निघून गेला.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
अमोल काणेकर यांनी अश्विन मुश्रानच्या पत्नीवरही आरोप केले. त्यांच्या दाव्यानुसार, वादादरम्यान अभिनेत्याची पत्नी त्यांच्यावर थुंकली. स्थानिकांनी अश्विनची गाडी थांबवली आणि ती परत देण्यास नकार दिला. जोपर्यंत अभिनेता परत येऊन माफी मागत नाही, तोपर्यंत गाडी परत करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन मुश्रान काही वेळानं परत आला आणि त्याने माफी मागितली.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा