Headlines

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूर


मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला किशोर यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी वेगळा सूर लावला. ‘राजकीय सल्ल्यापेक्षा जमिनीवरील काम महत्त्वाचे आहे’, असे सांगत तटकरे यांनी किशोर यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह तीव्र झाल्याची चर्चा आहे.

गेल्या तीन महिन्यांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची गुरुवारी दुसऱ्यांदा भेट घेतली. पक्षासाठी रणनीती आखण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. परंतु, किशोर यांनी तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा निराधार असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले असले तरी सुनील तटकरे यांच्या विधानामुळे पक्षांतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले.

Maharashtra TimesMumbai FDA Raid: मुंबईत तुकाराम मुंढेंचा मोठा दणका: IIT पवईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ४ परवाने निलंबित, ५ व्यवसाय बंद करण्याचे आदेशतटकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर यांच्यावर नाव न घेता शरसंधान केले. ‘नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे आहोत’, असे तटकरे म्हणाले. ‘माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही सर्वेक्षणावर मी आजवर विश्वास ठेवलेला नाही. प्रशांत किशोर यांची पक्षात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली की नाही, याची मला माहिती नाही. पण, ज्या अर्थी मला माहिती नाही, म्हणजे ती झालेली नाही. प्रशांत किशोर हे जरी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना भेटले असले तरी निर्णय मात्र कोअर कमिटीच्या बैठकीतच होतो’, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘२०२४च्या लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक जिंकणार नाही, असे सर्वेक्षण असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते सर्व खोटे ठरवत मी निवडून आलो. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणारे कार्यकर्ते असल्याने जनतेत जाऊन काम करण्याची आम्हाला सवय आहे. त्यातूनच आम्हाला मतदारांचा कलही लक्षात येतो. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी ‘डिझाइन बॉक्स’ ही कंपनी जरी सोबत घेतली तरी त्यांनी एक संकल्पना मांडली. पण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अजित पवार यांच्यासह आम्ही अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. त्याचा लाभ आम्हाला विधानसभा निवडणुकीत झाला’, याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.

Maharashtra TimesVikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलंराष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांचे पद निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या कार्यकारिणीत जाहीर न करणे, सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, आदींमुळे पटेल, तटकरे यांच्यासारखे नेते नाराज असल्याची पक्षात उघड चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्याच्या चर्चेनंतर पक्षातील ही दरी वाढत असल्याचे दिसू लागले होते.

नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवलेला नाही.- सुनील तटकरे

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत