Headlines

Dabur India ला दिलासा, ‘100%’ शुद्धतेवरून FSSAI Notice, Delhi High Court कडून विक्री बंदबाबत दिलासा – dabur india fssai 100 percent claims delhi high court stay


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीला 3 ऑगस्टला FSSAI म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं एक नोटीस दिली. ज्यात लिहिलं होतं की, डाबरनं त्यांच्या उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवावी. यासोबतच 100% स्वरूपाचे दिशाभूल करणारे दावे असलेली इतर खाद्य उत्पादनंही विक्रीतून काढून टाकावीत. प्राधिकरणानं डाबर इंडियाला निर्देश देताना 15 दिवसांच्या आत अॅक्शन टेकन रिपोर्ट म्हणजे नोटीसनंतर कोणती कारवाई करण्यात आली याचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले होते. दरम्यान ही नोटीस समोर येताच बाजारात खळबळ उडाली होती आणि Dabur India Ltd. चे शेअर्स काही प्रमाणात कोसळले होते. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी कंपनी लगेच दिल्ली उच्च न्यायालयात गेली होती ज्यावर आज सुनावणी झाली आणि डाबर कंपनीला दिलासा देताना FSSAI च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण काय आहे, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आपल्या नोटीसमध्ये कोणते मुद्दे मांडलेल होते, कोणकोणत्या उत्पादनांची विक्री थांबवण्याचे दिले होते, सोबतच 100% स्वरूपाचे दिशाभूल करणारे दावे असलेले इतर कोणते खाद्य उत्पादनं विक्रीतून काढून टाकण्याचे निर्देश दिले होते आणि डाबर इंडिया कोर्टात गेल्यानंतर सुनावणीत काय काय झालं हेच आपण सविस्तर पाहणार आहोत. #DaburIndia #FSSAI #DaburFSSAI #100PercentClaims #FoodSafety #FSSAIOrder #DaburProducts #DaburNews #DelhiHighCourt #DaburCase #FSSAINotice #DaburShares #DaburStock #FoodRegulator #ConsumerSafety #MisleadingClaims #IndiaNews #BusinessNews #StockMarketNewsOn August 3, FSSAI issued a notice to Dabur India, directing the company to immediately stop selling certain products and remove food products carrying misleading “100%” claims. FSSAI also asked Dabur to submit an Action Taken Report within 15 days. The notice triggered market concerns, and Dabur’s shares fell. Dabur then approached the Delhi High Court. In today’s hearing, the court granted interim relief to the company by staying the FSSAI order. So, what exactly did FSSAI allege? Which Dabur products were affected, and what happened during court hearing? Let’s take a detailed look.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत