राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर आता त्यांच्या पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सोमवारी (10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मिळाली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत”, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी पत्रकारांनी शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधानांची नुकतीच भेट घेतल्याचं सांगितलं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. “शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना नाष्ट्यासाठी बोलावलं होतं. आम्हाला नाष्ट्यासाठी बोलावलेलं नाही. आम्ही वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या संसदीय कार्यालयात भेट देणार आहोत. पंतप्रधान सर्व पक्षांच्या खासदारांना भेटतात. आम्ही अधिकृतपणे वेळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहोत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
FDRA बीलवर सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका
“दोन-तीन महत्त्वाच्या घटना संसदेत घडल्या आहेत. FCRA चे बील संसदेत येईल का? अशी चर्चा सुरु आहे. FCRA चे बील आता ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे माझी विनम्रपणे विनंती आहे की, घाई करु नका. सरकार आमच्यासोबत चर्चेला बसलं आणि जॉईन पार्लमेंट्री कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आमची चर्चेसाठी तयारी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करुन चालत नाही. चर्चाही करावी लागते. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की, FCRA बील हे परत घ्या, ते मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंट्री कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलं.
“माझी एवढीच मागणी आहे. जेव्हा जंतरमंतर आणि नीटबद्दल चर्चा झाली. तेव्हाही मी भारत सरकारला विनंती केली होती की, तुम्ही या सर्वांवर एसआयटी बसवा. एसआयची बसवून तुम्ही नक्की काय झालं, हे प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे. गनचा वापर कसा झाला? पारदर्शक एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. FCRA बीलची जॉईन पार्लमेंट्री कमिटीमध्ये चर्चा व्हावी”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
FCRA बील नेमकं काय आहे?
“FCRA हे बील फॉरेन फंडींगबद्दल आहे. ड्रग्जचे पैसे किंवा दहशतवाद्यांचे पैसे असतील तर त्यावर नक्कीच कारवाई करा. पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातील गरिब कष्ट करणाऱ्या मुलांना समजा पोलिओचे इंजेक्शन देत असतील, त्याला एनजीओ पैसे देत असेल तर त्याला काही प्रोब्लेम नाही. ते औषधांसाठी किंवा शिक्षणासाठी येत आहेत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“आपले जे नातेवाईक दुबईत राहतात, ते नातेवाईकांना पैसे पाठवतात. मग ते डर्टी मनी आहेत का? वेगवेगळ्या संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे FDRA हे बील आमच्यावर लादू नका. जॉईन पार्लमेंट्री किमिटीत चर्चा करुन, पारदर्शक भूमिका कशी राहील ते ठरवू. आमची चर्चेला सकारात्मक भूमिका राहील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा