Headlines

Mumbai local Train Ladies Coach Snake scare creates panic Kurla Station turns rumour Crime News; सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली


Mumbai Local Snake Scare : लोकलमधील लेडीज डब्यात साप असल्याची अफवा उडाल्यामुळे महिलांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि फलाटावरच गाडी थांबली.

Mumbai Local Kurla Central Railway Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : डोंबिवली-सीएसएमटीच्या महिला डब्यात साप शिरल्याच्या अफवेने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक रखडली. साप शोधण्यासाठी सीएसएमटीपर्यंतच्या प्रवासात तब्बल चार वेळा विविध स्थानकांत लोकल थांबवण्यात आली. कुर्ला स्थानकात सर्पमित्राच्या मदतीने केलेल्या तपासणीनंतर ही अफवा असल्याचे लक्षात आले आणि लोकल सीएसएमटीला रवाना करण्यात आली. या गोंधळामुळे २० लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला.

महिला डब्यात साप असल्याची अफवा

सकाळी ८.४१ वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे रवाना झालेली धीमी लोकल ९.१४ वाजता ठाणे स्थानकात पोहोचली. फलाट क्रमांक चारवर आलेल्या लोकलमधील महिला डब्यात साप असल्याची अफवा उडाली. त्यामुळे डब्यातील महिलांनी आपत्कालीन साखळी ओढली आणि फलाटावरच गाडी थांबली. सुमारे १२ मिनिटांनंतर गाडीत तपासणी केल्यावर साप आढळला नाही. त्यामुळे गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर मुलुंड आणि नाहूर स्थानकांत अनुक्रमे दोन आणि चार मिनिटे गाडी थांबवण्यात आली.

Maharashtra TimesVikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं

महिला प्रवाशांना खाली उतरवून तपासणी

दहा वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकात गाडी पोहोचली. मात्र सापाच्या अफवेमुळे फलाट क्रमांक चारऐवजी फलाट क्रमांक दोनवर आणण्यात आली. त्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रही फलाटावर उपस्थित होता. महिला डब्यातील प्रवाशांना खाली उतरवून सर्पमित्राने आसनाखाली डब्याच्या विविध भागांत तपासणी केली. मात्र त्यालाही साप आढळला नाही.

खबरदारी म्हणून महिला प्रवाशांना दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याची विनंती करण्यात आली. काही महिला त्याच डब्यातून प्रवास करण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे १०.१९ मिनिटांनी महिला डब्यात दोन महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून लोकल सीएसएमटीला रवाना करण्यात आली.

Maharashtra TimesPune Crime : शाळेपासून अफेअर, पण गर्लफ्रेण्ड पुण्यात मॅनेजरच्या प्रेमात पडली, 23 वर्षीय ‘एक्स’ने जीव घेतला, पोलिसांच्या धाडसाने हायवेवर धरपकड

लोकल वाहतुकीवर परिणाम

लोकलच्या वारंवार थांब्यामुळे मागील फेऱ्यांवर परिणाम झाला. सुमारे पाऊण तास विलंबाने लोकल सीएसएमटीत दाखल झाली. या मागे असलेल्या लोकलदेखील विलंबाने धावत होत्या.

दरम्यान, माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या दरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने वांद्रे ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.