Headlines

Satara SP Tusha Doshi Transfer After ZP Political Dispute 9 IPS Transfer in Maharashtra


साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची आज अखेर बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांच्या भूमिकेवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली होती. शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. याच प्रकरणी आता राज्य सरकारने तुषार दोशी यांची बदली केली आहे. तुषार दोशी यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं असून अवघ्या 11 महिन्यांत त्यांची बदली झाली आहे.

Tushar Doshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत झालेला राडा पोलीस अधीक्षक तुषार दोशींना चांगलाच भोवला आहे. दोशी यांची आज सांगलीला बदली करण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 22 मे 2025 रोजी दोशी हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. मात्र, 11 महिन्यातच त्यांची उचलबांगडी झाली आहे. जालना आणि सातारा येथील त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत प्रशासनाची भूमिका अत्यंत वादग्रस्त ठरली होती. पोलिसांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांना धक्काबुक्की केली होती. पोलिसांशी झालेल्या झटापटीत शंभूराज देसाई हे जखमी झाले होते तर मकरंद पाटील हे खाली पडले होते. भाजपाचे एक मंत्री, काही आमदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी कोणतीही अडवणूक न करता जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश दिला होता. त्या ठिकाणी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि एक गुंड प्रवृत्तीचा कार्यकर्ता देखील उपस्थित होता.

नेमकं कोणतं प्रकरण तुषार दोशींना भोवलं?

सातारा झेडपीत 20 मार्च रोजी झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी पूर्ण बहुमत असताना हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानापासून रोखत अपहरणाच्या कथित गुन्ह्यात अटक केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे दोन सदस्य देखील भाजपने फोडले होते. या नाट्यमय घडामोडींमुळे सातारा झेडपीची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. त्यानंतर काही दिवस एसपी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच तुषार दोशींनी पुन्हा कार्यभार घेतला होता. त्यानंतर आज सायंकाळी त्यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्याचा आदेश प्राप्त झाला. दोशी हे मूळचे रायगड जिल्ह्यातील महाडचे आहेत. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बी.एस्सी. पूर्ण केली. 2000 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. पहिली पोस्टींग चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे नक्षली प्रभाव असलेल्या ठिकाणी झाली होती. आतापर्यंत त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालना आणि सातारा येथे सेवा बजावली आहे. 2014 साली त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. तुषार दोशी यांच्यासह राज्यातील 9 IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

राज्यातील 9 IPS अधिकाऱ्यांची बदली

  1. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
  2. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांची पोलीस उपायुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
  4. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रच्या पोलीस उप महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. गचचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांची गडचिरोली पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे
  7. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  9. पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा