Headlines

Manoj jarange patil attack on maratha community leader after chandrashekhar bawanakule canceled kunbi certificates; मराठा नेत्यांच्या नाकावर टिच्चून बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रं रद्द केली, मराठा असल्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जरांगेंनी फटकारलं


सुधीर पाटील, सातारा : कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. या विषयावर त्यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये असलेल्या मराठा मंत्री, खासदार, आमदारांना फैलावर घेतलं आहे. तुमच्या नाकावर टिच्चून चंद्रशेखर बावनकुळेंनी गोरगरीब मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रं रद्द केली. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? असा सवाल त्यांनी मराठा समाजातील नेत्यांना केला आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू करणार आहेत. त्याच्या जनजागृतीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी कराड तालुक्यातील मसूर येथे त्यांचा जाहीर मेळावा झाला. कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करून जरांगे पाटील म्हणाले की, बावनकुळे जाहीरपणे प्रमाणपत्र रद्द करत असतील तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी तुमचं काय वाईट केलंय, असा प्रश्न सर्व पक्षातील मराठा मंत्री खासदार आमदार बावनकुळेंना का विचारत नाहीत? असा जाब जरांगे यांनी विचारला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला यावेळी महत्त्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले की, “तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या कुठल्याही पक्षात काम करा. परंतु ज्यावेळी मराठा समाजाची लेकरं संकटात येतील त्यावेळी पक्ष बघू नका. हे तुम्ही बावनकुळेंकडून शिका. याबाबतीत बावनकुळेंनी आपल्याला जागं आणि सावध केलंय. मी मराठ्यांना सुधारू देणार नाही, हा सरळ संदेश त्यांनी प्रमाणपत्र रद्द करून दिला आहे. मग तुमच्या जातीचं, लेकरा-बाळांचं वाटोळं होणार असेल तर तुम्ही पक्ष का बघता,” असा थेट सवाल त्यांनी मराठा समाजाला केला.

“आपले लोक राजकारणात असले पाहिजेतच. नाहीतर सत्ताधारी आपल्याला टिकून देणार नाहीत. परंतु राजकारण कधी करायचं आणि कधी नाही हे बावनकुळेंकडून शिकायचं. ते फक्त मतदानादिवशीच सगळ्या जाती-धर्माचे असल्याचे म्हणतात आणि निवडून आल्यानंतर मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतात. मग सगळ्या पक्षातील मराठा समाजाच्या मंत्री, खासदार आमदारांना मराठा असल्याची लाज वाटत नाही का?” असा बोचरा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत