Headlines

palghar dahanu govt hospital medical negligence 25 yrs old pregnant woman struggle; महिलादिनीच गर्भवतीचे हाल; सहा तास प्रसूती वेदना, 25 वर्षीय महिलेची नाजूक अवस्थेत वणवण


Dahanu Health System Failure: डहाणू रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय होत आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते.

dahanu hospital news
डहाणू रुग्णालयात गर्भवतीची गैरसोय(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, डहाणू: पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागांत गर्भवतींना उपचारासाठी झगडावे लागत आहे. ८ मार्च रोजी प्रसूतीसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या दर्शना सर्जन माच्छी (२५) या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी सहा तास प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या. तसेच, १०८ रुग्णवाहिका सेवाही वेळेवर उपलब्ध झाली नाही. अखेर कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार झाले.

आदिवासी व ग्रामीण भागात गरोदर मातांची नोंदणी झाल्यानंतर या महिला नऊ महिन्यांपर्यंत सरकारी रुग्णालयात उपचार घेतात. मात्र ऐन बाळंतपणावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना अन्यत्र जाण्याचा सल्ला दिला जातो. जोखमीच्या तसेच अतिजोखमीच्या प्रसूतीच्या कळा आणि उपचारात हेळसांड हे दुखणे पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण महिला अनेकवर्ष सोसत आहेत. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दर्शना माच्छी यांना असाच अनुभव आला.

Maharashtra TimesLPG Price Hike: कुटुंबाचे बजेट ‘गॅस’वर; ऐन उन्हाळ्यात सिलिंडरच्या दरवाढीचा ताप, हॉटेल व्यावसायिकही चिंतेत
डहाणू शहरातील वडकून येथे राहणारी दर्शना हिला शनिवारी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. कुटुंबीयांनी तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तिची सिझेरियन प्रसूती असल्याचे सांगून जोखमीच्या प्रसूतीसाठी गुजरातमध्ये नेण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. नऊ महिने सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर असा आदेश का दिला जातो याबाबत कुटुंबीयांनी विचारणा केली. या प्रसूतीसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्यावर रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरवर कॉल करून नोंदणी केली. मात्र किमान दीड-दोन तासानंतर सेवा मिळेल असे कुटुंबीयांना सांगण्यात आले.

लाडकी बहिण योजनेचं नाव सांगून कागदपत्रं मागितली, शिंदेंनी वाघमारेंच्या उमेदवारीचा किस्सा सांगितला

डहाणू शहरातील दोन खासगी रुग्णालयात कुटुंबीयांनी संपर्क साधला, परंतु तेथेही डॉक्टर उपलब्ध नव्हता. अन्य एका रुग्णालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तेथे दाखल करेपर्यंत पहाटेचे तीन वाजले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा