Headlines

जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?


ज्येष्ठ नेते रामराजे निंबळाकर यांनी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजा जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत खेळ जिवंत आहे, अशा आशयाचा व्हिडीओ रामराजे यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यांच्या या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Ramraje Nimbalkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेट्सवरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. “As long as the king stands, the game is alive” अर्थात ‘जोपर्यंत राजा टिकून आहे, तोपर्यंत खेळ जिवंत आहे’, या सुचक स्टेट्सद्वारे रामराजेंनी नेमका कुणाला इशारा दिलाय? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बुद्धिबळाच्या पटाचा संदर्भ देणारा व्हिडिओ स्टेट्सवर ठेवत रामराजेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘जोपर्यंत राजा जिवंत आहे तोपर्यंत खेळ जिवंत आहे’, असे त्यांनी सूचित केले आहे. तसेच ‘घोडे गेले, नवीन प्याद्यांचे इनकमिंग, उलटे निरोप सुरू झाले आहेत. जिथे आपण गेले आहात तो वन वे आहे. परतीची वाट नाही’, असा मजकूरही रामराजेंनी शेअर केला आहे. त्यामुळे रामराजेंचा हा सूचक इशारा विरोधकांना की विरोधकांकडे गेलेल्या आपल्या स्वकियांना? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फलटणमध्ये नेमकं काय घडलं आहे?

रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वज्ञात आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटणमध्ये लक्ष घालून विधानसभा निवडणुकीत रामराजेंचे निकटवर्तीय आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव करून रणजितसिंह निंबाळकरांचे समर्थक सचिन पाटील यांना निवडून आणलं. त्यानंतर फलटण नगरपालिकेतील रामराजेंच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपने सत्तांतर केले. त्यामुळे रामराजेंची साथ सोडून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले.

कार्यकर्त्यांची स्वगृही परतण्याची धरपड सुरु असल्याची चर्चा

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर देशात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. भाजप सरकार विरोधात लोक थेट बोलू लागले आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी स्वगृही परतण्याची धडपड सुरू केली आहे.

रामराजेंनी सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीरपणे याआधी फटकारलं

अडचणीच्या काळात साथ सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना रामराजेंनी जाहीर कार्यक्रमात अनेकदा फटकारले होते. आता त्यातील काही जणांना स्वगृही परतायचे आहे का? ‘परतीचे दोर कापले आहेत’, हा रामराजेंचा संदेश त्यांच्यासाठीच असल्याचे फलटणच्या राजकारणात बोलले जात आहे. त्याचबरोबर ‘वजीर गेला म्हणून बुद्धिबळाच्या खेळात राजा कधी हारत नाही’, हा संदर्भ देत रामराजेंनी आपल्या विरोधकांना थेट इशाराच दिल्याची चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वर्षभरापूर्वी रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चा, पण घडलं काहीच नाही

रामराजे हे सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मध्यंतरी ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण तसं काही घडलं नाही. रामराजे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांचे चिरंजीव अनिकेतराजे आणि चुलत बंधू संजीवराजे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेतून लढवली होती.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा