Raja Chaudhary : श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – श्वेता तिवारीचा एक्स पती आणि अभिनेता राजा चौधरी कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. राजा चौधरी आता पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजा चौधरीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.
राजा म्हणाला, ‘नाही, मला एकटेपणा जाणवत नाही. मी गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे आणि माझ्या पार्टनरसोबत आनंदी आहे. मी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. सर्व काही खूप सुरळीत चाललं आहे.’ तो लग्नाचा विचार करतो का? असं विचारलं असता राजाने लगेच नकार दिला आणि म्हणाला की, ‘नाही, लग्नानंतर सर्व काही बदलतं. माझ्यात आता लग्न करण्याचं धाडस राहिलेलं नाही. जर आज कोणी मला लग्न करायला सांगितलं, तर मी करणार नाही. मी त्यासाठी अजिबात तयार नाही.’
‘लिव्ह-इन रिलेशनशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण जर गोष्टी जुळल्या नाहीत, तर ते सहजपणे सोडून जाऊ शकतात. न्यायालयात जाऊन कायदेशीर कार्यवाही करण्याचं धाडस आता माझ्यात राहिलेलं नाही.’ असंही राजा चौधरीनं सांगितलं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजा चौधरी बोलत होता. Chinmayee Sumeet : ‘पक्षाप्रमाणेच निरर्थक गोष्टी करतायत, बेरोजगारी वाढवायची, मुलांचा आत्मसन्मान दुखवायचा’, कंगना रणौतवर चिन्मयी सुमीतचा संताप दरम्यान, राजा चौधरीची दोन लग्न झाली असून त्याचं पहिलं लग्न १९९८ मध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत झालेलं. श्वेतानं राजावर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर, तिनं २००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि २०१२ मध्ये राजा आणि श्वेताचा कायदेशीर घटस्फोट झाला. या लग्नापासून त्यांना पलक तिवारी नावाची एक मुलगी आहे. श्वेता तिवारीपासून विभक्त झाल्यानंतर, राजा चौधरीनं २०१५ मध्ये दिल्लीस्थित कॉर्पोरेट व्यावसायिक असलेल्या श्वेता सूदसोबत लग्न केलं. पण, हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि नंतर या जोडप्यानं कायदेशीर घटस्फोट घेतला.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा