Headlines

प्राजक्ता माळीचा वाढदिवस शेतातच साजरा;निसर्गप्रेमी प्राजक्ताचं कर्जतमधील निसर्गाच्या कुशीतलं फार्महाऊस आहे तरी कसं? – prajakta mali karjat farmhouse prajakta kunj home decor ideas


अभिनेत्री प्राजक्ता माळीने वाढदिवशी शेतात काम करत साधेपणाने दिवस साजरा केला.कर्जतमधील तिचं ‘प्राजक्त कुंज’ फार्महाऊस निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं असून साधेपणा आणि सौंदर्याचा सुंदर मेळ घालणारं आहे.याच फार्महाऊसच्या सजावटीतून घरासाठीही अनेक होम डोकॉर आयडिया घेता येतात.

Prajakta Mali Karjat Farmhouse
फोटो सौजन्य :- @prajaktkunj
अभिनय, निवेदन आणि आपल्या खास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वासोबतच निसर्गप्रेमासाठीही ओळखली जाते. वाढदिवसाच्या दिवशी शेतात काम करत तिने साधेपणाने हा खास दिवस साजरा केला. मातीशी नातं जोडणारा तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, प्राजक्ताचं कर्जतमधील ‘प्राजक्त कुंज’ हे फार्महाऊसही तिच्या निसर्गावरील प्रेमाची झलक दाखवतं. शहराच्या धावपळीपासून दूर, हिरवाईने नटलेल्या वातावरणात असलेलं हे फार्महाऊस प्राजक्तासाठी खास आहे. या ठिकाणाची रचना, आजूबाजूचा निसर्ग आणि घरातील सजावटीतून साधेपणा आणि निसर्गाचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. प्राजक्त कुंजची हीच खासियत घराच्या सजावटीसाठीही अनेक होम डेकॉर देऊन जाते.(फोटो सौजन्य :- @prajaktkunj, @prajakta_official)

कर्जतमध्ये आहे प्राजक्ताचं सुंदर फार्महाऊस

कर्जतमध्ये आहे प्राजक्ताचं सुंदर फार्महाऊस

कर्जत म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर, मोकळी हवा आणि पावसाळ्यात आणखी खुलून दिसणारा निसर्ग. अशाच वातावरणात प्राजक्ता माळीने आपलं फार्महाऊस उभारलं आहे.‘प्राजक्त कुंज’ हे तिच्यासाठी केवळ एक विकेंड होम नाही, तर रोजच्या धावपळीपासून काही काळ स्वतःला दूर ठेवण्यासाठीचं हक्काचं ठिकाण असल्याचं तिच्या पोस्टमधून जाणवतं. शहरात कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी निसर्गाच्या कुशीत काही क्षण निवांत घालवता यावेत, हीच या फार्महाऊसमागची कल्पना असल्याचं दिसतं. फार्महाऊसच्या आजूबाजूला असलेली हिरवाई या जागेच्या सौंदर्यात आणखी भर घालते. त्यामुळे घरात बसूनही बाहेरचा निसर्ग अनुभवता येतो.

लाकडी फर्निचरचा वापर

लाकडी फर्निचरचा वापर

निसर्गाच्या जवळ जाणारी घराची सजावट करायची असेल, तर लाकडी फर्निचर हा नेहमीच सुंदर पर्याय ठरतो. लाकडाचा नैसर्गिक पोत घराला उबदार आणि प्रसन्न वातावरण देतो. लिव्हिंग रूममध्ये लाकडी सेंटर टेबल, आरामदायी खुर्च्या, डायनिंग टेबल किंवा बेडरूममध्ये लाकडी बेड आणि कपाटाचा वापर केल्यास घराला साधा, एलिगंट आणि नैसर्गिक लूक मिळतो. त्यासोबत हलक्या रंगांचे कुशन, मातीच्या वस्तू आणि हिरवीगार रोपं ठेवल्यास संपूर्ण सजावटीला अधिक आकर्षक आणि निसर्गाशी जोडलेला टच देता येतो.

पडद्यांचा सिंपल लुक

पडद्यांचा सिंपल लुक

घराच्या सजावटीत पडद्यांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. निसर्गरम्य आणि शांत वातावरणाचा अनुभव कायम ठेवायचा असेल, तर पांढरे, क्रीम, बेज किंवा हलक्या रंगांचे साधे पडदे निवडता येतील. खूप जड डिझाइन किंवा भडक प्रिंट्सऐवजी हलक्या कापडाचे पडदे वापरल्यास घरात नैसर्गिक प्रकाश सहज येतो आणि जागा अधिक मोकळी व प्रसन्न दिसते. विशेषतः मोठ्या खिडक्यांसाठी फ्लोअर-लेंथ पडदे वापरल्यास घराला साधा, एलिगंट आणि मॉडर्न लूक मिळतो.

साधं सिंपल किचन

साधं सिंपल  किचन

घराच्या सजावटीत किचनही साधं, स्वच्छ आणि मोकळं ठेवता येतं. पांढरा, क्रीम किंवा लाकडी रंगाच्या कॅबिनेट्स वापरल्यास किचनला नैसर्गिक आणि आकर्षक लूक मिळतो. गरजेपुरतंच फर्निचर ठेवून काउंटरवर कमी वस्तू ठेवल्यास किचन अधिक नीटनेटके दिसते. लाकडी शेल्फ, छोट्या रोपांची सजावट आणि साध्या डिझाइनच्या वस्तूंचा वापर करून किचनला मॉडर्नसोबतच उबदार आणि घरगुती लूक देता येतो.

घराभोवती हिरवळ

घराभोवती हिरवळ

घराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि रोपं असतील, तर संपूर्ण परिसर अधिक प्रसन्न आणि सुंदर दिसतो. छोटंसं गार्डन, कुंड्यांमधील फुलझाडं किंवा अंगणात सावली देणारी झाडं लावून घराला निसर्गरम्य लूक देता येतो. हिरवाईमुळे घराचं सौंदर्य तर वाढतंच, शिवाय सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा निवांत वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याचा आनंदही मिळतो.

योग्य रंगाचा वापर

योग्य रंगाचा वापर

घराच्या सजावटीत रंगांची निवड खूप महत्त्वाची असते. निसर्गाच्या जवळ जाणारा आणि शांत वातावरणाचा अनुभव देणारा लूक हवा असेल, तर बेज, क्रीम, पांढरा, ऑलिव्ह ग्रीन, ब्राऊन आणि मातीच्या रंगछटा वापरता येतात. भिंतींसाठी हलके रंग निवडल्यास घर अधिक प्रशस्त आणि मोकळं दिसतं, तर लाकडी फर्निचर आणि हिरव्या रोपांमुळे या रंगांना सुंदर कॉन्ट्रास्ट मिळतो. फार्महाऊससारख्या घरात अतिशय गडद किंवा भडक रंगांचा अतिरेक टाळून नैसर्गिक रंगछटांचा वापर केल्यास साधेपणातही घराला आकर्षक आणि आलिशान लूक देता येतो.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा