Headlines

Maratha Kunbi Certificate : Eknath Shinde यांना आधी झापलं, आता सॉफ्ट कॉर्नर, टीकेसाठी Bawankule का? – kunbi certificate row manoj jarange fadnavis bawankule eknath shinde


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठवाड्यात कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात वैधता पडताळणी समितीने रद्द केली. त्यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय. ही प्रमाणपत्रं अवैध ठरवल्यानंतर मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं सध्या जरांगे पाटील विरुद्ध बावनकुळे असा थेट सामना सुरू झाला असून सरकारवरोधात हल्लाबोल करताना पाटील चांगलेच भडकलेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करत असताना जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर टीका करताना थेट जहरी टीकाही केली होती. त्यानंतर लगेच त्यांनी आपल्या भूमिकेवरून युटर्न मारत, कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठ्यांमध्ये निर्माण झालेली क्रेझ कमी करण्याचा डाव असू शकतो, असं म्हणत शंका उपस्थित केली आहे. यावरूनच त्यांच्या टीकेचा सूर बदलला असून मुख्यमंत्री आणि बावनकुळेंविरोधात अनेक शंका उपस्थित केल्यात. तेव्हा कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध झाल्याचं नेमकं प्रकरण काय, त्यावरून जरांगे पाटलांनी कोणकोणत्या नेत्यांवर निशाणा साधला होता, ते कुणाच्या सांगण्यावरून रद्द झाले याचा खुलासा करताना कोणता आरोप केला होता आणि तीन वर्षांत पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर थेट जहरी टीका केल्यानंतर जरांगे पाटलांची त्यांच्याबद्दलची भूमिका कशी सॉफ्ट झाली आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#ManojJarangePatil #KunbiCertificate #KunbiCasteCertificate #MarathaReservation #MarathaReservationNews #DevendraFadnavis #EknathShinde #ChandrashekharBawankule #MarathaNews #MaharashtraPolitics #MarathaKunbiIssue #KunbiRecords #MarathaProtest #ManojJarangeNews #MaharashtraNews #MarathaReservationControversy #KunbiCertificateCancellation #MarathwadaNews #MarathaLeaders #JarangePatilVsBawankule #MarathaVsOBC #MarathaOBCConflict #OBCReservationMaharashtra #MarathaAndOBC #OBCProtestFour Maratha women representatives in Marathwada had their Kunbi caste certificates cancelled after the caste validity committee declared them invalid. The decision has once again heated up the Maratha reservation and Kunbi records issue. Manoj Jarange Patil has launched serious allegations against Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and BJP leader Chandrashekhar Bawankule, leading to a direct face-off between Jarange and Bawankule. Interestingly, after sharply criticising Eknath Shinde for the first time, Jarange later softened his stand, suggesting that the cancellation of Kunbi certificates could be an attempt to damage Shinde’s popularity among Marathas. So, what exactly is the Kunbi certificate controversy? Who did Jarange target, what allegations did he make about the decision, and why did his stance on Eknath Shinde suddenly change?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत