Headlines

Pune niece cheats uncle of 45 lakhs; पुण्यातील तरुणीने काकालाच फसवलं; लखनौला नेलं, विश्वास संपादन केला अन् नंतर केसाने गळा कापला


छत्रपती संभाजीनगर: रक्ताच्या नात्यावर आणि कुटुंबावर ठेवलेला विश्वास एका वृद्ध काकाला अत्यंत महागात पडला आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेवर डोळा ठेवून सख्ख्या पुतणीनेच आपल्या काकाला पैशांच्या दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार पुतणीसह एकूण १३ जणांविरोधात शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणी रमेश ढोरे ( सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्य संशयित पुतणीचे नाव आहे. सुमित कदम, क्रिस्टीना, कविता, राजू, वनलानुन्थरी, आशिष वाणी, अदैल्लु, मोहम्मद सिराजोद्दीन, इस्माइल न्युमो, नरेश कटारीया, रेहान खान आणि इम्रान अली अशा १३ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, श्रीकृष्ण आनंदराव ढोरे वय ७२ वर्षे, रा. सुमंगल विहार, गारखेडा हे २०१४ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. सेवा समाप्तीनंतर त्यांच्या हातात निवृत्तीचे सुमारे ४५ लाख रुपये आले होते. हीच संधी साधून पुतणी कल्याणी हिने काकाचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली. बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवून फारसा फायदा होणार नाही. मी सांगते तिथे पैशांची गुंतवणूक करा, एका वर्षाच्या आत दुप्पट-तिप्पट मोठा परतावा मिळवून देते, असे खोटे आमिष तिने काकाला दाखवले होते.

लखनौचा हायप्रोफाईल दौरा आणि कोऱ्या चेकवर स्वाक्षऱ्या

काकाचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी कल्याणीने एक मोठी स्क्रिप्ट तयार केली होती. तिने १८ जुलै २०१९ रोजी काकाला थेट उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नेले. तिथे आयोजित इंडियाज बिझनेस कॉन्क्लेव्ह २०१९ या मोठ्या व्यावसायिक सेमिनारमध्ये तिने काकाला सामील करून घेतले. या हायप्रोफाईल दौऱ्यामुळे काकाचा पुतणीवर पूर्ण विश्वास बसला. लखनौवरून परतल्यानंतर जुलै ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान कल्याणी काकाला बँकेत घेऊन गेली. तिथे तिने हुशारीने त्यांच्याकडून काही कोऱ्या चेकवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरात आरटीजीएस व नेफ्टच्या स्लिप्स भरून काकाच्या खात्यावरील ४५ लाख १५ हजार रुपये तिच्या ओळखीच्या १२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर वर्ग करून उधळले.

६८ लाखांच्या फेक चेकचा स्क्रीनशॉट अन्…

गुंतवणूक करून ६ महिने उलटल्यानंतर श्रीकृष्ण ढोरे यांनी पैशांच्या परताव्याबाबत पुतणीकडे विचारणा केली. त्यावर पैसे योग्य ठिकाणी गुंतवले आहेत, काळजी करू नका असे सांगत कल्याणीने त्यांच्या व्हॉट्सॲपवर चक्क ६८ लाख रुपयांच्या सिटी बँकेच्या चेकचा फोटो पाठवला. मात्र, काकांनी तो चेक पाहताच तिने काही वेळातच तो मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत