Headlines

Thane News: पावसाळी पाहणी दौऱ्यावरुन शिवसेनेत ‘नाट्यसरी’; महापौरांसमोरच नगरसेवकांची नाराजी – corporators express dissatisfaction to mayor during monsoon inspection tour of ghodbunder road area


Thane News: पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या नालेसफाई आणि सर्वेक्षणाचा फज्जा पहिल्याच मुसळधार पावसात उडाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

thane news
घोडबंदर रोड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
विनित जांगळे, ठाणे : शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड परिसरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्याची पूर्वसूचना स्थानिक नगरसेवकांना न दिल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमक्ष नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पावसाळी पाहणी दौऱ्यावरून शिवसेनेतच कलगीतुरा रंगल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

संततधार पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले आहे. नागरिकांना याचा त्रास होऊ नये आणि साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा, या उद्देशाने महापौर पिंपळोलकर यांनी सलग दुसऱ्या दिवशी विविध भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी, ‘हा आमच्या प्रभागाचा दौरा आहे. आम्हालाच का बोलावले नाही? आमच्या भागातील नाले अजूनही तुंबलेले आहेत. आयुक्तांनाही येथे यायला वेळ नाही,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, या दौऱ्याबाबतची माहिती महापौर कार्यालयातून संबंधित नगरसेवकांना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले.

Maharashtra TimesMumbai Local: कळव्यातील लोकल प्रवाशांची कोंडी; कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर उभारली भिंत, जनक्षोभाची भीती
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ‘एक्स’वर महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे निर्देश
या पाहणीदरम्यान बाळकूम येथील महालक्ष्मी नगर परिसरातही पाणी साचल्याचे निदर्शनास आले. या परिसराच्या मागील बाजूस हायलँड परिसरातील भिंत कोसळल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथील दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याचे आदेश महापौरांनी दिले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक देवराम भोईर यांच्या कार्यालयाला भेट देऊन समस्यांची चर्चा केली. यावेळी नगरसेविका उषा भोईर आणि सपना भोईर उपस्थित होत्या.

Maharashtra TimesThane Tree Collapsed : ठाण्यात झाड कोसळले, पादचाऱ्याच्या छाती आणि डोक्याला दुखापत, महापौर ॲक्शन मोडमध्ये
मेट्रोच्या कामाने रस्त्यांची दुरावस्था
घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथील पेपर प्रॉडक्ट कंपनी परिसरातून या दौऱ्याची सुरवात करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मानपाडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. या परिसरात नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून तो तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा