Headlines

Manoj jarange patil strong reaction to navnath waghmares controversial statement about maratha women; नवनाथ वाघमारे मराठा तरुणींबद्दल वादग्रस्त बोलले, आता जरांगे पाटलांचा पलटवार


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पारा चांगलाच चढला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जो मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलेल, त्याला यापुढे कोणालाही सुट्टी नाही, असा थेट इशारा देत जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून राज्य सरकारविरोधात आक्रमक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.

नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी कितीही आक्रमक बोललो तरी कधी कोणाच्या महिलांवर किंवा लेकी-बाळींवर बोलत नाही. मी कोणाच्या समाजाबाबतही बोलत नाही. पण तुम्ही मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलून अत्यंत वाईट पातळी गाठली आहे. तुमची दुसरी बाजू आणि काय कारनामे आहेत ते दाखवायचे का? मराठ्यांची मुलेही सोपी नाहीत. आता मराठेही तुम्हाला याच भाषेत उत्तर देतील.”

“२० ऑगस्टपासून दौरा; २९ ऑगस्टला सरकारची जिरवणार”

आपल्या पुढील आंदोलनाची रणनीती स्पष्ट करताना जरांगे यांनी सांगितले की, २० ते २५ ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात त्यांचा दौरा होणार आहे. २८ ऑगस्टच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल. मराठ्यांनी दबावाखाली न राहता रस्त्यावर येऊन हक्क मागायला शिकले पाहिजे. अन्यायाविरोधात पेटून उठा, आता सरकारची जिरवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरत जरांगे म्हणाले, शासनाने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे. यातील एकही नोंद कमी केली तर हे सरकार पाडणार.देवेंद्र फडणवीस यांनी समाजात उद्रेक होईल असे वागू नये, असा सल्ला देत त्यांनी बावनकुळे, शिरसाठ आणि भुमरे यांच्यावर मराठा आंदोलनाविरोधात कारस्थाने रचल्याचा गंभीर आरोप केला.

मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देणे, सातारा, कोल्हापूर व बॉम्बे गव्हर्नमेंटच्या जीआरची अंमलबजावणी करणे, आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळात नोकरी देणे आणि मराठा विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी शाळा-महाविद्यालयांनी त्वरित परत करणे या प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार केला. तसंच २९ ऑगस्टच्या आंदोलनात पैशांचा सुळसुळाट आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणीही कोणाला पैसे देऊ नका, जे करायचे ते स्वतः करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत