Headlines

Pune News: स्मशानभूमी पाण्यात! कमरेभर पाणी, गाळातून बॉडी नेण्याची वेळ; अंत्यविधीसाठी मनस्ताप


Pune News: भाटघर धरणाच्या काठावरील पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेली. यामुळे अत्यंविधीसाठी लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. स्मशानभूमीला चारही दिशांनी पाण्याने पूर्ण वेढले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-09-01T080614
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भोर : स्मशानभूमी पाण्यात गेल्यामुळे तालुक्यातील पसुरे गावातील लोकांना अंत्यविधीसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमी चारही दिशेने पाण्याने पूर्ण वेढल्यामुळे मृतदेह जागेवर नेण्यासाठी नातेवाईक व स्थानिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

भाटघरच्या काठावर पसुरे गावआहे. पाण्याची सोय पाहून धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. मात्र, ते चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे दर वर्षी पावसाळ्यातील चार महिने अंत्यविधीसाठी असा कठीण प्रसंग उद्भवतो, असा आरोप स्थानिकांनी केला. पावसाळ्यात खूप पाणी आले, की स्मशानभूमीजवळ जाणारा रस्ता पाण्यात जातो.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: राहुल गांधी लक्ष्य, महिला आरक्षणाचे मारेकरी असल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघातमृतदेह नेताना दमछाक

गेले काही दिवस शहर आणि तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाटघर धरण शंभर टक्के भरले असून, बॅकवॉटरचे पाणी सर्वत्र पसरले आहे. शनिवारी गावात एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी नागरिक स्मशानभूमीकडे निघाले. चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिल्यामुळे मृतदेह हातात उंच धरून उचलावा लागला; शिवाय सुमारे ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत तो नेतना नातेवाइकांची पुरती दमछाक झाली. कमरेपेक्षा जास्त पाणी आणि लाल मातीच्या गाळातून चालणे खूप अवघड आणि त्रासदायक झाले होते. स्मशानभूमीतील ओट्यावरील खड्ड्यात पाणी साठले. त्यामुळे दुसऱ्या मोकळ्या जागेत अग्निसंस्कार करण्यात आले.

Maharashtra TimesPune News : कार घेतली, हायवेवर जंगी सेलिब्रेशन, रील व्हायरल होताच पुणे पोलिसांनी हवा काढलीसध्या स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला १० ते १२ फूट खोल पाणी साचले आहे. चुकून एखादी व्यक्ती पाय घसरून खाली पडण्याचा धोकाही संभवतो, असे स्थानिकांनी सांगितले.

या गावाने धरणासाठी खूप मोठी जमीन दिली आहे. आम्हाला कोणत्याच अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. किमान अंत्यविधीसाठी सुरक्षित व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी मागणी जमलेल्या ग्रामस्थांनी या वेळी केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा