Headlines

सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजेच्या वादावरही भाष्य


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नको याबाबत सुरु असलेल्या वादावर रोखठोक भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कॉक्रोच जनता पार्टीवरही टीका केली.

Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात सध्या गणेशोत्सवात डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. अनेकांनी गणेशोत्सवात डीजे वाजवला जाऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. तर काही जणांनी डीजेवर बंदीच्या मागणीवर टीका केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. विशेष म्हणजे पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी डीजेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली.

“गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न नक्की मला विचारला जाईल. मी पुणेकरांना सांगू इच्छितो की, पुण्यामध्येच ही क्षमता आहे, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकर करु शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांची सीजेपीवर टीका

“सीजेपी हे जे नाव आहे तिला केवळ एक छोटीशी संघटना समजू नका. सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम आहे. या प्रोग्रमामध्ये तम्हाला जे चार-पाच तरुण दिसत आहेत ते नाहीत. हे फक्त मोहरे आहेत. सीजेपीच्या बैठकांमध्ये कोण आहेत? भारत जोडोच्या त्याच 180 संघटना आहेत, ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या विरोधात नरेटिव्ह तयार केला. यावेळी नवीन नाव घेऊन ते आपल्या विरोधात मैदानात उतरत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Maharashtra TimesNCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी“आपल्याला माहिती आहे, रामायनात काल होता. तो काल वेगवेगळे वेष घ्यायचा. तो कधी साधूचा तर कधी सामान्य माणसाचा वेष घ्यायचा. वेगवेगळ्या वेषात तो राक्षसी इरादे घेऊन जायचा. पण ज्यावेळेस प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं तर काल देखील जिंकू शकला नाही. आम्ही केवळ रामाचं नाव घेणारे नाहीत. प्रभू श्रीरामांनी जी तत्वे दिली आहेत त्याप्रमाणे राज्य कारभार चालवण्याचा प्रयत्न करणारी आहोत. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो, कार्यपद्धतीतला बदल समजून घेतला पाहिजे”, असं आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.

फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना इन्स्टाग्राम वापरण्याचं आवाहन

“सध्या कम्युनिकेशनचं माध्यम बदललं आहे. आपली युवा पिढी टीव्ही चॅनल पाहत नाहीत आणि पेपरही पाहत नाहीत. त्यांचं सर्व लक्ष मोबाईल फोनवर आहे. त्यामुळे प्रत्येक चॅनलची व्हिवरशिप ही डिजीटल प्लॅटफॉर्मवर जास्त आहे. जे 40 ते 60 सेकंदची बातमी बनवतात त्याच जास्त लोकांपर्यत पोहचतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आता लोकांपर्यंत बातमी पोहोचवण्याचं माध्यम फेसबुक किंवा व्हाट्सअप राहिलेलं नाही. आज सोशल मीडियामध्ये 40 टक्के ट्राफीक एकट्या इन्स्टाग्रामवर आहे.”

Maharashtra TimesCrime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हा“आपल्यापैकी 90 टक्के लोकं अजून फेसबुकवरच अडले आहेत. फेसबुकवर आलेली आपली बातमी आपण स्वत: वाचून अतिशय आनंदी होतो. मला अनेक लोकं सांगतात की, भाऊ फेसबुकवर शेअर केलं. फेसबुकही महत्त्वाचे आहे. सगळी माध्यमे महत्त्वाची आहेत. पण फेक नरेटिव्हचा मुकाबला करायचा असेल तर अस्त्र आणि शस्त्रही तीच लागतील आणि कार्यपद्धती सुपिरियर लागेल.”