Headlines

दादर स्थानकाच्या पूर्व परिसराचा होणार कायापालट ;टॅक्सी, ‘बेस्ट’साठी स्वतंत्र मार्गिका,अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई


Dadar Railway Station:दादर रेल्वे स्टेशन नेहमीच गजबजलेलं असत. प्रवाशांची रेलचेल जास्त असल्याने रिक्षा ,टॅक्सी यांनी रस्ते भरलेले असतात.नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.दादरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दादर पूर्व स्थानकाच्या बाहेरील परिसरात नवे बदल केले जाणार आहेत.

दादर पूर्व रेल्वे स्टेशन
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई:नागरिकांची वर्दळ आणि वाहनांच्या गर्दीसाठी दादर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम परिसर कायमच ओळखला जातो. दादर पूर्वेलाही टॅक्सी, खासगी वाहने, बेस्ट बसगाड्यांमुळे कोंडीतून स्थानक गाठताना किंवा स्थानक परिसरातून बाहेर पडताना दमछाक होते. आता मात्र हा परिसरही कात टाकणार आहे.

प्रशासनाकडून अंतिम निर्णय

दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिका , स्थानिक लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलिस आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून हा परिसर अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर लवकरच संबंधित प्रशासनाकडून अंतिम निर्णय होईल.

परिसर मोकळा केला जाणार आहे.

दादर पूर्वेला टॅक्सी, खासगी वाहने, बेस्ट बस तसेच, अनधिकृत टॅक्सी सेवेमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी स्थानक परिसरात टॅक्सी आणि बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका, टॅक्सीसाठी स्वतंत्र स्टॅण्ड, प्रवाशांसाठी शेड आणि आसनव्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. तसेच, गाळेधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून परिसर मोकळा केला जाणार आहे.

संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली

दादर रेल्वे स्थानक पूर्व आणि आसपासच्या परिसराची नुकतीच संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त, माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बेस्ट बस वाहतूक व नियोजन विभागाचे अधिकारी, दादर रेल्वे स्थानक व्यवस्थापक तसेच, शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

Maharashtra TimesMumbai Ganeshotsav 2026: यंदा ‘संतुलना’चे मोल! मुंबईतील गणेशोत्सवात उंच मूर्तींऐवजी तोल सांभाळणाऱ्या, अधांतरी मूर्तींचे आकर्षण

समस्यांचा आढावा घेतला.

दादर रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होते. पूर्वेला स्थानकाबाहेर पडताच नागरिकांना वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रिक्षा-टॅक्सी आणि बसमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा त्रास, परिसरातील गर्दी आणि सुरक्षिततेशी संबंधित समस्या यांचा संबंधित यंत्रणांनी आढावा घेतला.

Maharashtra TimesThane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर

टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टॅण्ड उभारण्याचे नियोजन

मुंबईबाहेरून दादर येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित निवारा शेड, सुलभ पादचारी मार्ग, शिस्तबद्ध रिक्षा-टॅक्सी आणि बेस्ट बस व्यवस्था, चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली. दादर पूर्वेला स्वामीनारायण मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात टॅक्सींची ये-जा असते. टॅक्सी आणि खासगी वाहनांमध्ये शिस्त नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यामुळे टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टॅण्ड उभारण्याचे नियोजन असल्याचे महापालिकासूत्रांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा