रीलच्या नादात महामार्गावर जंगी सेलिब्रेशन करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. एका इसमाने कार खरेदी केली आणि ती कार कंटेनरवरुन थेट महामार्गावर नेली. तिथे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलं आणि जंगी हवा केली. पण या हवा करणाऱ्यांची पुणे पोलिसांनी चांगलीच हवा काढली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावर नवी कोरी गाडी घेऊन केलेला थाटमाट आता चांगलाच महागात पडला आहे. नवी गाडी खरेदी केल्यानंतर तिचे महामार्गावर करण्यात आलेले फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र, या शूटिंगदरम्यान महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधितांवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट रोजी सोमनाथ अशोक केदारी यांनी शोरूममधून नवी कोरी गाडी खरेदी केली. नव्या गाडीचे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही गाडी महामार्गावरून नेण्यात आली. गाडी वाहून नेण्यासाठी एका कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या कंटेनरवर नवी कोरी गाडी ठेवण्यात आली होती.
या गाडीच्या अवतीभोवती मित्रांची वाहने होती, तर पुढे फॉर्च्युनर कार होती. या वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. दुसरीकडे, या संपूर्ण सोहळ्याचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येत होते. नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याची सोशल मीडिया रील तयार करण्यात आली.
रील व्हायरल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित
ही रील सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र, रील व्हायरल होताच या प्रकारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. सार्वजनिक महामार्गावर वाहनांचा ताफा उभा करून किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ शूट करणे कितपत योग्य आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
कारचा चालक आणि फोटोग्राफर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोशल मीडियावरील व्हायरल रील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर बावधन पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या रीलशी संबंधित व्यक्तींचा शोध घेतला. त्यानंतर फॉर्च्युनर कारचा चालक सोमनाथ अशोक केदारी तसेच फोटोग्राफर अजय संभाजी यादव यांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच शूटिंगमध्ये वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि नवी कोरी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सेलिब्रेशन अंगाशी
आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात अनेक तरुण नवी गाडी, महागडी बाईक किंवा इतर वाहन घेतल्यानंतर त्याचा थाटामाटात व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. काही वेळा या प्रसिद्धीच्या नादात सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियम याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, सोशल मीडियावर काही सेकंदांची प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला हा प्रकार आता कायदेशीर कारवाईचे कारण ठरू शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.
Mumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरूत्यामुळे रील बनवताना नियमांचे पालन करा, सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य टाळा. कारण रील व्हायरल झाली म्हणून प्रसिद्धी मिळेलच असे नाही; कधी कधी त्याच रीलमुळे थेट पोलिसांच्या रडारवरही यावे लागू शकते, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा