Headlines

Parineeta Borthakur : ‘माझ्यासोबत संबंध ठेवावे लागतील’, सिनेमाच्या नावाखाली दिग्दर्शकाची विचित्र मागणी, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग


Parineeta Borthakur : अभिनेत्री परिणीता बोर्थाकुरनं एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Parineeta Borthakur On Casting Couch Experience
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – चित्रपटसृष्टीचं जग बाहेरून जितकं ग्लॅमरस दिसतं तितक्याच या जगात अनेक अडचणी असतात. कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री परिणीता बोर्थाकुरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीतील एक काळं सत्य उघड केलं असून आपलं दुःख व्यक्त केलंय.

आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या परिणीतानं चित्रपटसृष्टीतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक धक्कादायक घटना सांगितली. अभिनेत्रीने ‘टेलीचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ‘कास्टिंग काउच’चा सामना करावा लागला होता.
Maharashtra TimesSachin Goswami : विकृतीचा कळस! आक्षेपार्ह थंबनेल देऊन हास्यजत्रेचे एपिसोड पोस्ट; सचिन गोस्वामी प्रचंड संतापले
इंडस्ट्रीतील ‘काळं वास्तव’ आणि ‘कास्टिंग काउच’बद्दल विचारलं असता, परिणीतानं आपला भूतकाळातील अनुभव मनमोकळेपणानं सांगितला. अभिनेत्रीनं सांगितलं की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती आणि नुकतीच तिच्या करिअरची सुरुवात करत होती. एका प्रसिद्ध निर्मात्यानं तिला चित्रपटाचं ऍग्रिमेंट करण्याच्या बहाण्यानं भेटायला बोलावले. मात्र, त्या भेटीत दिग्दर्शकाने जे केलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

त्या दिग्दर्शकानं परिणीताकडे शरीरसुखाची मागणी केली, त्यामुळे अभिनेत्री खूप घाबरली. तिला धक्का बसला आणि तिनं लगेचच ते ऍग्रिमेंट मोडलं. अभिनेत्री म्हणाली की, हा क्षण तिच्यासाठी एक धडा होता. प्रसंग सांगताना परिणीता म्हणाली की, ‘माझ्या करिअरच्या सुरुवातीला, मला एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, माझा फोटो शॉर्टलिस्ट झाला आहे. मी तिथे गेले. तिथे इतर मुली आणि पुरुष होते, आणि मी सगळ्यांना भेटले. मग मला सांगण्यात आलं की, माझी निवड करण्यात आली आहे. ऍग्रिमेंटवर सही करण्यासाठी ये. तो त्याच्या असिस्टंटला काहीतरी म्हणाला, आणि मग तो असिस्टंट निघून गेला.’
Maharashtra TimesNiti Taylor : ‘एक्स बॉयफ्रेंडनं मला सिगारेटचा चटका दिलेला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग; म्हणाली, ‘तो मनोरुग्ण होता’
‘त्यानंतर, तो मला म्हणाला की तू आता माझी नायिका आहेस. मी तेव्हा २१ वर्षांची होते. म्हणून मी हो म्हणाले. मग तो मला म्हणाला की, त्याला माझ्या शारीरिक हालचाली बघायच्या आहेत. मला वाटलं की तो डान्सबद्दल बोलत आहे, पण मग तो म्हणाला, ‘माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली. मी लगेच उभी राहिले आणि म्हणाले की, मला तुमचा चित्रपट करायचा नाही, आणि मग मी तिथून पळून गेले. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं. ते म्हणाले, ‘हे सगळं सोडून दे, इथे ये. काही गरज नाही.’ मग दिग्दर्शकाने पुन्हा मला फोन केला आणि घडलेला प्रकार कुणालाही न सांगण्याची विनंती केली.’ असं परिणीतानं शेवटी सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा