Farhana Bhatt Casting Couch Memory : इंडस्ट्रीत काम करताना कलाकारांना मोठ्या कामाचं आमिष दाखवत अनेकदा वाईट हेतूने बोलवालं जातं . या विषयावर कलाकार शांत राहतात तर काही निडरपणे भाष्य करतात. अभिनेत्री फरहाना भट्टने तिला आलेला अनुभव एका मुलाखतीत सांगितला.

बिग बॉस 19 मध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री फरहाना भट्ट. फरहाना भट्ट ही बिग बॉस 19 ची फायनलिस्ट होती. या शोमध्ये ती तिच्या तिखट स्वभाव तसेच स्पष्टवक्तेपणासाठी जास्त चर्चेत आली. या शोनंतर तिने नशीब जास्त चमकले कारण तिला वेगवेगळ्या ऑफर्स मिळू लागल्या. एका गाण्याच्या अल्बममध्ये दिसल्यानंतर ती आता खतरों के खिलाडी 15 मध्येही दिसणार आहे.
Kangana Ranaut On Sharmila Tagore :वंदे मातरम् च्या पहिल्या दोनच ओळी ठीक! शर्मिला टागोर यांच्या मतावर कंगना रणौतचा निशाणा; हिंदू-मुस्लिम विचारांतून बाहेर पडण्याचा सल्ला
एका मुलाखतीत फरहानाने तिच्या आयुष्यात घडलेली एक भयंकर घटना शेअर केली. त्यात ती कास्टिंग काउचसारख्या प्रकाराची शिकार होण्यापासून थोडक्यात वाचली होती.
कश्मीरमध्ये 15 मार्च 1997 मध्ये जन्माला आलेली फरहाना तिचे करियर घडवण्यासाठी मुंबईत राहते. करियरच्या सुरुवातीला तिला एका महिलेने तिला फोन करुन बॉलिवूड सिनेमात काम देते असे आमिष दाखवत मुंबईला बोलवून घेतलेले. फरहाना भट्टने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या महिलेने मला म्हटले- लवकरच शूट सुरू होणार आहे. हॉटेलमध्ये राहण्याची सोयही केली आहे. तिचं ऐकून मी मुंबईला आली. पण मुंबईत आल्यावर मला हॉटेलमध्ये नेण्याऐवजी एक दिग्दर्शकाच्या घरी नेलं गेलं.
फरहाना भट्टने त्या रात्रीच्या आठवणी सांगताना म्हटले की, मला तिथे रात्री कॉण्ट्रॅक्ट वाचायला दिले गेले. त्यात एक अट होती की अभिनेत्रीला काही आठवडे दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावे लागेल. अभिनेत्री पुढे सांगितले की ते कॉन्ट्रॅक्ट वाचताच माझ्या लक्षात आलेलं की इथे काहीतरी गडबड आहे. मी लगेचच त्या महिलेला फोन केला जिने मला या फिल्मची ऑफर दिलेली. त्याचवेळी दिग्दर्शकाने मला त्याच्या खोलीत बोलावले. मी खूप घाबरले होते.
Aditi Sarangdhar On Neelam Shirke : माझं आणि नीलम शिर्केचं भांडण होतं, वादळवाटच्या अवॉर्डनंतर काय घडलेलं? अदिती सारंगधरनं सांगितला कोल्ड वॉरचा किस्सा
फरहाना पुढे म्हणाली- त्या दिग्दर्शकाने मला खोलीत बसवून ठेवले. मी माझ्या स्वरक्षणासाठी बाजूचा फ्लॉवर पॉट हातात पकडून ठेवला होता. मी माझ्या मैत्रिणीला मेसेज करुन याची कल्पना दिलेली. तिला मी सांगितलं होती की जर मला काही चुकीच होतय असं जाणवलं तर मी लगेच हल्ला करेन. त्यानंतर तिने त्या दिग्दर्शकावर दबाव आणून तिचे व तिच्या मैत्रिणीचे परतीचे तिकिट काढून घेतले अन् श्रीनगरला परतली.
फरहाना भट्टला नंतर समजलं की तो कथित दिग्दर्शक बऱ्याच जणांना असा धोका देऊन झाला होता. त्याने निर्मात्यांचे पैसे बुडावले होते अन् नंतर गायब झालेला. फरहानाच्या मते जर ती सतर्क नसती तर परिस्थिती नक्कीच बिघडली असती.
फरहाना भट्ट बद्दल बोलायचे झाल्यास तिने श्रीनगर मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले नंतर मुंबईत तिने मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेत पदवी मिळवली. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2016 मध्ये तिने सनशाइन म्यझिक एंड ट्रॅव्हल्समधून तिने सनी कौशलसोबत बॉलिवूडमध्ये काम करायाला सुरुवात केली होती. या व्यतिरिक्त ती लैला मजनू या सिनेमातही दिसली आहे.

