![]()
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी १४ राज्यांत मोठी कारवाई करत ‘आयएसआय’ (ISI) समर्थित गँगस्टर आणि दहशतवादी शहजाद भट्टी याचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याची माहिती नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली होती. या कारवाईत २०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, या मोठ्या कारवाईनंतर आता पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने भारताचे दावे फेटाळताना पोकळ धमक्या दिल्या आहेत, तर दुसरीकडे त्याच्या या व्हिडिओवरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भट्टीचे व्हिडिओतील दावे आणि जंतर-मंतर कनेक्शन शहजाद भट्टीने व्हिडिओमध्ये भारतीय यंत्रणांना आव्हान दिले आहे. “जे लोक पकडले गेलेत, ते माझ्या नेटवर्कचे नसून ‘CJP’ (कॉकरोच जनता पार्टी) चे आहेत. माझे सुमारे ३ हजार लोक अजूनही बाहेर सुरक्षित आहेत,” असा दावा त्याने केला आहे. तसेच त्याने अटक केलेल्यांचे चेहरे आणि जप्त केलेली शस्त्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले आहे. भट्टीने ‘CJP’ आणि जंतर-मंतर येथील आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना कायदेशीर व आर्थिक मदत देण्याची ऑफरही दिली आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, यंत्रणांच्या धडक कारवाईमुळे नेटवर्कचे झालेले नुकसान लपवण्यासाठी आणि समर्थकांमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी भट्टीने हा व्हिडिओ जारी केला असण्याची शक्यता आहे. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा विरोधकांवर हल्लाबोल भट्टीने व्हिडिओत वापरलेल्या ‘CJP’ (कॉकरोच जनता पार्टी) या शब्दावरून भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) वर व्हिडिओ शेअर करत अभिजित दिपके यांचे अभिनंदन केले आणि राजकीय पक्षांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. उपाध्याय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “आता तर गोष्टी आणखीनच स्पष्ट होत आहेत… पाकिस्तानी गँगस्टर आणि ISI चा हस्तक शहजाद भट्टीचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा, वरून ‘डीप स्टेट’ची साथ! म्हणजे देशविरोधी शक्तींना तरी आपला आवडता पक्ष कोणता हे चांगलंच कळलंय! एक भारताचा नागरिक म्हणून एकच प्रश्न आहे – या पक्षांना पाठिंबा जर सीमेपलीकडून मिळत असेल, तर त्याचा जाब यांनी जनतेला द्यायला नको?” यंत्रणांसमोर आता ‘डिजिटल’ आव्हान भट्टीच्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली तरी, यातून सुरक्षा यंत्रणांसमोरील एक नवीन आव्हान समोर आले आहे. १७ ऑगस्ट रोजी अमित शहांनी केलेले ट्विट.. हेही वाचा.. महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्यांवर राज्यभरात 150 ठिकाणी छापे
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, एटीएसने मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. सविस्तर वाचा
Source link
पाकिस्तानी गँगस्टरचा CJP ला पाठिंबा कसा?:आमदार संजय उपाध्यायांचा विरोधकांना सवाल, शहजाद भट्टीचा व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा
