Headlines

बाप तसा बेटा! वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा वडिलांसारखाच कडक बॅकफूट पंच, Video एकदा पाहाच


Aryavir Sehwag Video : भारताचा ‘वाघ’म्हणजेच वीरेंद्र सेहवाग ज्याची प्रत्येक विरोधी गोलंदाजांना धास्ती असायची. आता तो निवृत्त झाला असला तरी त्याचा मुलगा आता मैदानात खेळतोय. पठ्ठ्याने वडिलांसारखाच सेम टू सेम बॅकफूट पंच खेळलाय. व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Aryavir Sehwag
Aryavir Sehwag Four Same To Same Shor(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेम टू सेम आपल्या वडिलांसारखाचा त्याने बॅकफुच पंच खेळला असून तो पाहताना सर्वांना वीरूच्या बॅकफुट पंचचा आठवण झाली. आर्यवीर सेहवागचा हा व्हिडीओ कोणत्या मॅचमधील आणि कधी खेळला हे जाणून घ्या.

दिल्ली प्रीमियर लीग २०२६ मधील ३५ वा सामना वेस्ट दिल्ली लायन्स आणि न्यू दिल्ली टायगर्समध्ये पार पडला. हा सामना अरूण जेटली स्टेडियमध्ये होता, या सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स संघाने ६ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये नीतीश राणा आणि आयुष डोसेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या पण सर्वत्र चर्चा ही सेहवागच्या सुपुत्राची झाली. आर्यवीर याने १४ चेंडूत २२ धावा करताना यामध्ये ४ चौकार लगावले. सेहवागचा मुलगा आर्यवीर हा सुद्धा ओपनिंगलाच खेळायला येतो.

Maharashtra TimesIND vs SL 2nd Test : विजयानंतरही दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात दोन मोठे बदल, कोणाची होणार एन्ट्री? प्लेइंग 11 जाणून घ्या
या सामन्यात न्यू दिल्ली टायगर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतानास १९५-६ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून आर्यवीर आणि कृष यादव ह ओपनिंगला आले. पहिल्या विकेटसाठी ४१ धावा केल्या होत्या. आर्यवीर याने वेस्ट दिल्लीला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. पठ्ठ्याने २२ धावा करताना त्यातील १६ धाव या चौकारांनीच केल्या होत्या. त्यानंतर नीतीश राणाने २३ चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी केली. कॅप्टन आयुष डोसेजाने ३३ चेंडूत ६४ धावा करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांच्या आक्रमक खेळीपेक्षा सर्वात जास्त सेहवागच्या मुलाची होत आहे.

Maharashtra TimesINDvsPakistan : हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताच्या वाघांकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम, आता पुढील आव्हान कसे असणार? जाणून घ्या
दरम्यान, सोशल मीडियावर आर्यवीरने मारलेला बॅकफुट पंचच्या चौकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डीपीएल (दिल्ली प्रीमियर लीगने) एक व्हिडीओ शेअर केला असू त्यामध्ये सेहवागचा असाच खेळलेला शॉट आणि आता त्याची कार्बन कॉपी केल्यासारखा आर्यवीरचा शॉट मारलेला दिसत आहे. अनेक चाहत्यांनी ज्युनियर सेहवाग असे म्हटलं आहे. तर काहींना भारतीय संघाचं भविष्य असं म्हटलंय.