Pushkar Jog Fumes On Non Marathi Auto Driver Disrespect towards Marathi In Maharashtra ; Pushkar Jog : मुंबई मराठी माणसाच्याच बापाची, माज दादागिरी तुमच्या राज्यात! अमराठी रिक्षाचालकांच्या उद्धटपणावर पुष्कर जोग व्यक्त
Pushkar Jog Fumes On Non Marathi Auto Driver Disrespect towards Marathi In Maharashtra ; Pushkar Jog : मुंबई मराठी माणसाच्याच बापाची, माज दादागिरी तुमच्या राज्यात! अमराठी रिक्षाचालकांच्या उद्धटपणावर पुष्कर जोग व्यक्त
Pushkar Jog On Auto Driver Marathi : पुष्कर जोग त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्याने अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी न बोलण्याच्या उद्धटपणावर राग व्यक्त केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे ही सक्ती खूप आधीपासून सुरू असली तरी त्यावरुन सतत होणारा वाद काही नवा नाही. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत आता बऱ्यात परप्रांतीयानी तळ ठोकला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुळ रहिवासी असलेले मराठी भाषिक लोक कुठेतरी कमी होताना किंवा त्यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे.
सार्वजनिक वाहतुकीदरम्यान बरेचदा मराठी माणसांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अमराठी चालक मराठी माणसांशी मुजोरीने बोलतात अशा तक्रारी येत असतात. यावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक निर्णय घेतला. राज्यातील रिक्षाचालकांना किमान किंवा गरजेपुरतं तरी मराठी यायलाच हवं नाहीतर त्यांच्या वाहन चलनाचा परवाना रद्द केला जाईल. पण त्यांच्या या निर्णयावर काही युपीकडील रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला होता.
पुष्कर जोगने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “मुंबई मराठी माणसाच्याच बापाची आहे. माज, दादागिरी तुमच्या राज्यात… अरे जे राज्य तुम्हाला अन्न देतय, रोजगार देतय, पेसे देतय, मान सन्मान देतय, निदान त्याची तरी किंमत ठेवा. हम नही बोलेंगे मराठी जो उखाडना है उखाड लो … मग उखाडल्यावर बोलू नका… ” या पोस्टसोबत त्याने रोख ठोक आणि जोग बोलणार असे हॅशटॅगही दिले आहेत.
अभिनेता पुष्कर जोग याशिवाय एका मुलाखतीमुळे सुद्धा चर्चेत आहे. या मुलाखतीत सुद्धा त्याने त्याचे मराठीवरील प्रेम व्यक्त केले होते. मराठी सिनेमा हा ऑस्करपर्यंत जायलाच हवा आणि तो जिंकायला हवा मग तो माझा असो वा आणखी कोणाचा पण मराठी असला पाहिजे असे मत व्यक्त केले होते. याशिवाय काही महिन्यांपूर्वी पुष्कर जोगने महागडी रेंज रोव्हर खरेदी केली होती. याविषयी सुद्धा त्याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, मी ती महागडी गाडी मुद्दामच दाखवायला घेतली. कारण आपल्या मुंबईतच मराठी कलाकारांना दुय्यम स्थान दिलं जातं. मुंबईतल्याच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वगैरे बरेचदा तेथील वॉचमन किंवा इतर कर्मचारी हे साध्या गाड्यांमधून आलेल्या मराठी कलाकारांना कमी लेखतात. त्यामुळे त्यांना मला दाखवून द्यायचं आहे की मराठी कलाकार सुद्धा महागड्या कारने फिरु शकतो म्हणून मी ती कार घेतली.
पुष्कर जोगच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2007 मध्ये जबरदस्त या सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने एक डान्स रिएलिटी शो जिंकला. पुढे त्याने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केले. पण त्याला खरी प्रसिद्धी बिग बॉसमध्ये मिळाली. या शोच्या पहिल्याच सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तो या शोचा उपविजेता ठरला. बिग बॉस मराठी 1 च्या कालावधीत त्याने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
पुष्कर जोगने अदृष्य, मुसाफिरा, व्हिक्टोरिया एक रहस्य, बाप माणूस, वेल डन बेबी, हार्दिक शुभेच्छा, ती एंड ती यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा