Headlines

राज ठाकरेंचं समर्थन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा; मनसेकडून सत्कार – bjp leader resigns over support for raj thackeray; honoured by mns



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ चक्क एका भाजप पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे ऐकताना अनेकांना आश्चर्य वाटेल पण कल्याण डोंबिवलीमध्ये घडलेलं हे प्रकरण सध्या चर्चेत आलंय. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरेंवर टीका आणि एकेरी उल्लेख केल्याने सर्वत्र पडसाद आता उमटू लागले. मात्र परब यांचं भाषण भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाच पटलं नाही, असं दिसून येतंय. पेशाने शिक्षक असलेले आणि भाजपा शिक्षक सेलचे सचिव दुर्गेश बागुल यांनी परब यांचं भाषण न पटलेल्याची भूमिका मांडली. यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बागुल यांना बोलावून त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. अखेर दुर्गेश बागुल यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला. तर मराठी अस्मिता जपली म्हणून मनसेकडून बागूल यांचा सत्कार करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत