वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी मंदिरांमध्ये त्वरित बसवा सीसीटीव्ही:लासलगावमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांचे आवाहन
शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अलीकडील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंदिरांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन यावेळी सागर कोते यांनी केले. बैठकीत मंदिर परिसरात दर्जेदार सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी…
